Navi Mumbai Crime : बहिणीचं प्रेम भावाला मान्य नव्हतं, मग भररस्त्यातच बहिणीच्या प्रियकराला तुडवलं !

बहिणीचे प्रेमसंबंध भावाला मान्य नव्हते. मग भावाने भररस्त्यात जे केले त्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भररस्त्यातील राडा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Navi Mumbai Crime : बहिणीचं प्रेम भावाला मान्य नव्हतं, मग भररस्त्यातच बहिणीच्या प्रियकराला तुडवलं !
प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणावर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 9:28 AM

नवी मुंबई / 16 ऑगस्ट 2023 : नात्यातील बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून वाशीतील रघुलीला मॉलमध्ये एका तरुणावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हाजीज सरवैया असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन सिद्धीकी आणि युसूफ शाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जखमींना मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

वाशीतील रघुलीला मॉलबाहेरच राडा

शुभम हा सोमवारी मध्यरात्री मित्राचा वाढदिवस साजरा करायला रघुलीला मॉलमध्ये गेला होता. यावेळी आरोपींनी त्याला मॉलबाहेर गाठला. शुभमवर हल्ला होताना पाहून त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी पुढे आला. आरोपींनी त्यालाही मारहाण केली. बघ्यांनी घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मारहाणीची घटना

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपीच्या नात्यातील बहिणीसोबत शुभमचे प्रेमसंबंध होते. याच रागातून त्याने शुभमवर हल्ला केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले.

हे सुद्धा वाचा

खुलेआम घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भररस्त्यात चाकू काढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Non Stop LIVE Update
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.