AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसाढवळ्या तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, तिघांवर प्राणघातक हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक

चौकातील गाळ्यांच्या वादातून तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापुरात घडली आहे. या हल्ल्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमध्ये हलवण्यात आले आहे.

दिवसाढवळ्या तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, तिघांवर प्राणघातक हल्ला, एकाची प्रकृती चिंताजनक
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 4:38 PM
Share

पुणे : चौकातील गाळ्यांच्या वादातून तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापुरात घडली. या हल्ल्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमध्ये हलवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये बाभुळगावात 11 जुलै रोजी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी दिवसाढवळ्या हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. (Indapur accused man attacked on three people with sword one in critical condition)

गाळे देण्यास नकार दिल्यामुळे तिघांवर प्राणघातक हल्ला

इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव या ठिकाणी 11 जुलै रोजी भर दुपारी थरार घडला. मोक्याच्या ठिकाणी असणारे व्यापारी गाळे मिळवण्यासाठी येथे काही लोकांनी हातात नंग्या तलवारी घेत धुमाकूळ घातला. गाळे देण्यास नकार दिल्यानंतर या लोकांनी तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये आरोपी हे तलवारी हातात घेत गावात दहशत माजवीताना दिसून येत आहेत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार बाभुळगावचे उपसरपंच नागनाथ भिवा गुरगुडे, सरपंच महिलेचे पती सोमनाथ जावळे यांच्यासह आणखी सात जणांनी तलावरीचा धाक दाखवत दुकानदारास धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातील मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकीसुद्धा फिर्यादी दत्तात्रोय उंबरे यांना दिली. असे धमकावूनसुद्धा गाळे देण्यास नकार दिल्यानंतर नऊ जणांनी उंबरे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश

दरम्यान या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र विशेष बाब म्हणजे ही घटना होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तसेच पोलीस या घटनेसंदर्भात बोलण्यासही टाळाटाळ करीत आहेत.

इतर बातम्या :

दुर्मीळ मगरीच्या सात जिवंत पिल्लांची तस्करी, ठाण्यात आरोपीला अटक

पुण्यात महिला डॉक्टरच्या बेडरुम-बाथरुममध्ये छुपे कॅमेरे, बड्या एमडी डॉक्टरला अटक

मुंबईत 61 वर्षीय महिलेची आत्महत्या, सातव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं

(Indapur accused man attacked on three people with sword one in critical condition)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.