AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 61 वर्षीय महिलेची आत्महत्या, सातव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं

माया जयशंकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सायन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारही सुरु होते. माया यांनी आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे

मुंबईत 61 वर्षीय महिलेची आत्महत्या, सातव्या मजल्यावरुन उडी घेत आयुष्य संपवलं
बोरिवलीत वृद्ध महिलेची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई : 61 वर्षीय वृद्धेने राहत्या घरातून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बोरिवली पूर्व भागातील उंच इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन तिने उडी मारली. महिलेच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

61 वर्षीय माया जयशंकर सिंह यांनी आत्महत्या केली. मुंबईतील बोरिवली पूर्व भागातील मागाठाणे परिसरात ही घटना घडली. संक्रमण शिबिर बिल्डिंग क्रमांक 4 A मध्ये त्या राहत होत्या. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन माया सिंह यांनी खाली उडी मारली.

माया जयशंकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सायन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारही सुरु होते. माया यांनी आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह

दुसरीकडे, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नवविवाहितेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना कालच उघडकीस आली होती. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडला. महिलेची हत्या झाली, तिने आत्महत्या केली, की अपघात झाला, याचा आता पोलीस तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबीयांसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह

ममता पटेल असे मृतदेह मिळालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वसईच्या एव्हरशाईन परिसरातील राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ममता पटेल गेल्या बुधवारपासून बेपत्ता होती.

मॉर्निंग वॉकला गेल्यापासून बेपत्ता

बुधवार सकाळी सहा वाजता ममता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर तिचा मृतदेह वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर सापडला.

संबंधित बातम्या :

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

नऊ दिवसांपूर्वीच लग्न, माहेरी येऊन विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

(Mumbai Borivali 61 years old lady allegedly commits suicide by jumping from high-rise building)

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.