AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात अनैतिक संबंधांतून घरमालकिणीची हत्या, दहा दिवसांनी भाडेकरुला बिहारमध्ये बेड्या

आरोपी गुलाम शेख पुण्याच्या लोहगाव भागातील मोझेआळी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होता. या काळात घर मालकिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु झाले. काही दिवसांपूर्वी महिलेच्या कुटुंबीयांना दोघांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली.

पुण्यात अनैतिक संबंधांतून घरमालकिणीची हत्या, दहा दिवसांनी भाडेकरुला बिहारमध्ये बेड्या
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 12:06 PM
Share

पुणे : अनैतिक संबंधांना नकार (Extra Marital Affair) दिल्याने घर मालकिणीचा गळा आवळून खून (Tenant Killed House Owner) केल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुण्यात उघडकीस आली होती. हत्येनंतर पसार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी बिहार येथे जाऊन शिताफीने अटक केली. आरोपी मोहम्मद गुलाब मोहम्मद मुक्तार शेख (वय 32 वर्ष, रा. मूळचा बिहार, सध्या राहणार पठारे वस्ती लोहगाव) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जातो. मात्र कुटुंबीयांना या प्रकाराची कुणकुण लागताच महिलेने हे संबंध सुरु ठेवण्यास विरोध केला होता. त्यामुळे चिडलेल्या भाडेकरुने 30 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

6 फेब्रुवारी रोजी पुण्यातील मोझे आळी लोहगाव येथे एक महिला स्वतःच्या घरात बाथरुम मध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली होती. संशयास्पदरित्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे विमानतळ पोलिसांनी केलेल्या तपासात सदर महिलेचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याचा शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाला होता. अधिक तपासात अनैतिक संबंधातून पूर्वी त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूने तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

नेमकं काय घडलं?

आरोपी गुलाम शेख पुण्याच्या लोहगाव भागातील मोझेआळी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होता. या काळात घर मालकिणीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु झाले. काही दिवसांपूर्वी महिलेच्या कुटुंबीयांना दोघांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली. त्यानंतर आरोपीला घर रिकामं करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर आरोपी लोहगावमधील संत नगर परिसरात राहायला गेला.

रविवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी आरोपी महिलेच्या घरी आला होता. त्यावेळी ती घरी एकटीच होती. त्याने महिलेकडे अनैतिक संबंधांची मागणी केली, मात्र तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा बाथरुममध्ये टाकत घराला कुलूप लावून तो घटनास्थळावरुन पसार झाला. महिलेचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना घराला कुलूप दिसलं. बराच वेळ महिलेच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करुनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बिहारमध्ये बेड्या

या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपी इसम मोहम्मद मुक्तार शेख याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पाठवले होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मोहम्मद हा खून करून त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून त्यानेच सदर महिलेचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.

संबंधित बातम्या :

डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडात संशयित पती संदीपच्या मावसभावाला नाशिकमध्ये बेड्या, तपासावर प्रश्नचिन्ह, कारण…

14 वर्षांच्या चुलत भावासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, दहा वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत 21 वर्षीय तरुणाची हत्या, वर्गमित्राला अटक

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.