पुण्यातील दहशतवाद्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला, ISIS मॉड्यूल प्रकरणातील आरोपपत्रात दावा

Nia on pune isis module : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आता आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सात आरोपींवर एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. देशाची सुरक्षा आणि अखंडतेला या आरोपींनी धोका निर्माण केला होता.

पुण्यातील दहशतवाद्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला, ISIS मॉड्यूल प्रकरणातील आरोपपत्रात दावा
nia agencyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 8:17 AM

पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हे आरोपपत्र दाखल केले आहे. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर पुणे शहरातील इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा झाला होता. या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. त्यानंतर एनआयएकडून या प्रकरणात सात जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनआयएने विशेष न्यायालयात स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

एनआयएनने मोहम्मद इमरान, मोहम्मद याकूब साकी, अब्दुल कदीर, नसीरुद्दीन काजी, जुल्फिकार अली, शमील साकिब नाचन आणि आकिफ अतीक नाचन या सात आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातील दोन आरोपी मध्य प्रदेशातील तर पाच आरोपी महाराष्ट्रातील आहेत. या आरोपींना इसिससाठी काम केले. देशात दहशतवाद माजवण्याचा त्यांचा कट होता. देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांना विदेशातून पैसे मिळत होते.

काय आहे आरोपपत्रात

दशतवाद्यांनी दशतवादी तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेतले होते. त्यांनी अनेक अतिरेकी तयार करण्याचा प्रयत्न केला. आयईडी बनवण्यासाठी त्यांनी सामान एकत्र केले. लोकांमध्ये दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी जंगलामध्ये बॉम्बस्फोटाची चाचणीही केली होती. आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. त्यांना विदेशातून पैसा मिळाला. इसिसच्या इशाऱ्यावर हे सात जण काम करत होते. त्यासाठी त्यांनी नेटवर्क तयार केले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा या राज्यात त्यांनी सर्च ऑपरेशन केले होते.

हे सुद्धा वाचा

या आरोपींवर आरोपपत्र

  • मोहम्मद इमरान-मोहम्मद यूसुफ खान उर्फ ‘मटका’ उर्फ ‘आमिर अब्दुल हमीद खान’- मध्य प्रदेश
  • मोहम्मद यूनुस-मोहम्मद याकूब साकी उर्फ ‘आदिल’ उर्फ ‘आदिल सलीम खान’- मध्य प्रदेश
  • कदीर दस्तगीर पठान उर्फ ‘अब्दुल कदीर’- महाराष्ट्र
  • सीमाब नसीरुद्दीन काजी- महाराष्ट्र
  • जुल्फिकार अली बडौदावाला उर्फ ‘लालाभाई’ उर्फ ‘सैफ’- महाराष्ट्र
  • शमिल साकिब नाचन- महाराष्ट्र
  • आकिफ अतीक नाचन- महाराष्ट्र
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.