बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या

दहावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या आणि सध्या बारावी इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडरने (वय 17 वर्ष) इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली.

बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या
पुण्यात अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 3:16 PM

पुणे : बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड भागात ही घटना घडली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुलगी खाली पडल्याचा शेजाऱ्यांना आवाज आला

दहावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या आणि सध्या बारावी इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडरने (वय 17 वर्ष) इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणाऱ्या शेजाऱ्यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिलं असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी पडली असल्याचं दिसून आलं. त्यांनी तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली.

बालपणीपासून घोडेस्वारीचे धडे

मिळालेल्या माहितीनुसार मयत विद्यार्थिनी ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. तिच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून ती घोडेस्वारीचे धडे घेत होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने हॉर्स रायडिंगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

लग्नाला विरोध, जळगावात प्रेमी युगलाची आत्महत्या

दुसरीकडे, लग्नाला विरोध झाल्याने प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या नव्या इमारतीत गळफास घेऊन दोघांनी आयुष्य संपवलं. जिन्यावर उभं राहून छताला गळफास दोघांनी जीवनाची अखेर केली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात वाडे येथे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या :

सुट्टी नाकारल्यावरुन CRPF जवानाचा गोळीबार, वरिष्ठ अधिकारी शहीद, 29 वर्षांनी आरोपी सापडला

कुटुंबीयांचा लग्नाला विरोध, शाळेच्या नव्या इमारतीत प्रेमी युगलाचा गळफास

(Pune 17 years old National level Horse Riding champion minor girl commits suicide)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.