AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील दर्गा प्रकरणात अफवा पसरवली, आता आरोपींना घडणार अद्दल, पुणे पोलिसांचे मोठे पाऊल

Pune Crime News: कसबा पेठेतील दर्ग्याचा अतिक्रमणाचा वाद मिटल्यानंतर त्यानंतर पुणे पोलिसांनी आपला मोर्चा अफवा पसरवणाऱ्यांकडे वळवला. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला.

पुण्यातील दर्गा प्रकरणात अफवा पसरवली, आता आरोपींना घडणार अद्दल, पुणे पोलिसांचे मोठे पाऊल
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 10, 2024 | 11:05 AM
Share

अभिजित पोते, पुणे | दि. 10 मार्च 2024 : पुणे शहरात शुक्रवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. कसबा पेठेत दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याची अफवा काही समाजकंटकांनी पसरवली होती. हे प्रकरण पुणे पोलिसांनी संयमाने हाताळत शहरात शांतता निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या ट्रस्टची बैठक घेतली. या बैठकीत दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढण्याची तयारी ट्रस्टकडून देण्यात आली. अतिक्रमणाचा वाद मिटल्यानंतर त्यानंतर पुणे पोलिसांनी आपला मोर्चा अफवा पसरवणाऱ्यांकडे वळवला. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करत ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला.

दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा परिसरात असणाऱ्या दर्ग्या संदर्भात अफवा पसरवत अनेक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करण्यात आली होती. यामुळे पुणे पोलिसांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रमाणे 30 ते 35 जणांवर पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांना चांगली अद्दल घडणार आहे.

काय होते प्रकरण

पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकाम रात्री पाडण्यात येणार असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री कसबा पेठेतील दर्ग्यासमोर गर्दी जमा होऊ लागली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत बंदोबस्त वाढवला. तसेच दुसरीकडे ट्रस्टींची बैठक घेतली. सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्या आयुक्त अमितेश कुमार यांनी रद्द केल्या. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर सुरु केलेल्या या उपायांमुळे पुणे शहरात कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. शहरात शांतता निर्माण झाली.

ट्रस्टीचे एक पाऊल, मनपाकडून दुसरे पाऊल

दर्ग्यातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय ट्रस्टींकडून घेण्यात आला. त्यानंतर पुणे मनपाने आणखी एक पाऊल पुढे केले.  ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल