रणजीत जाधव, TV9 मराठी, लोणावळा : एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl Molested) केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Police Arrest) केली आहे. या आरोपीचं नाव शंकर पानसिंग बहाद्दूर थापा (Shankar Paansingh Bahadur Thapa) असं आहे. अत्याचार करण्यात आलेली पीडित मुलगी ही नेपाळून आली होती. विशेष म्हणजे नात्यातीलच मुलीवर आरोपी थापाने अत्याचार केल्याचंही समोर आलंय. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जातेय. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा परिसरात खळबळ माजलीय.