AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंतवणूकदारांना गंडा, पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक

गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

गुंतवणूकदारांना गंडा, पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक
गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी अमित लंकडला अटक
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 11:50 AM
Share

पुणे : पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून (Pune Lunkad Realty Firms) ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला (Amit Lunkad) अटक केली. पुण्यात डीएसकेनंतर (DSK Group) लंकड ग्रुपकडून फसवणुकीचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. (Pune Lunkad Realty Firms Amit Lunkad arrested for duping investors)

काय आहे घोटाळा

गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आणखी काही कोटींचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमित लंकडची येरवडा तुरुंगात रवानगी

एमपीआयडी कायद्या अंतर्गत अमित लंकडवर कारवाई करण्यात आली आहे. लंकडला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पुण्यातील राहत्या घरातून सोमवारी रात्री अटक झाल्यानंतर मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.

सहा साक्षीदारांचे जबाब

या प्रकरणाची तक्रार पुण्यातील आंबेगाव बुद्रुक भागातील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या 48 वर्षीय संजय विलास होनराव यांनी केली होती. या प्रकरणात अन्य 6 साक्षीदारांनी आपला जबाब नोंदवले आहे. म्हणूनच, लंकडच्या विरोधात गुंतवणूकदारांच्या हिताच्या संरक्षणासाठीचा कायदा देखील लागू करण्यात आला आहे. या गुंतवणूक योजनेविरोधात अनेक साक्षीदार पुढे आल्यामुळे लंकडची पोलीस कोठडी आणि जामीन अर्जही फेटाळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

नागपुरात बेरोजगारांची दुप्पट रकमेचं आमिष दाखवून फसवणूक, 70 कोटींचा घोटाळा?; आठ जणांना अटक

(Pune Lunkad Realty Firms Amit Lunkad arrested for duping investors)

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.