पुण्यात स्मशानभूमीतच युवकाची हत्या, दोघे जण ताब्यात

पुण्यातील मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास सोनवणे नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला.

पुण्यात स्मशानभूमीतच युवकाची हत्या, दोघे जण ताब्यात
पुण्यात युवकाची हत्या
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 10:54 AM

पुणे : स्मशानभूमीतच युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच जणांनी मिळून तरुणाची निर्घृण हत्या केली. पुणे जिल्ह्यात लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत मांजरीतील स्मशानभूमीत ही घटना घडली. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील मांजरीमध्ये असलेल्या स्मशानभूमीत रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास सोनवणे नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला. एकूण पाच जणांनी विकासची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यापैकी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

भिवंडीत ओला कार चालकाची हत्या

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या (ओला) ड्रायव्हरचा हा मृतदेह होता. चालकाची गळा आवळून हत्या केल्याचं तपासादरम्यान समोर आलं. प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पद्मा नगर – भिवंडी येथील रहिवासी होता. मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

व्यवस्थापक म्हणून नोकरी गेल्यानंतर ड्रायव्हरचे काम

यंत्रमाग कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत असताना लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे आर्थिक टंचाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या व्हॅगन आर कारला ओलामध्ये लावून घेतलं. स्वतःच ड्रायव्हर म्हणून त्याने मागील एक महिन्यापासून काम करण्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या :

मॅनेजरची नोकरी गेली, महिन्यापासून ओला कारचा ड्रायव्हर, भिवंडीत गाडीमध्येच गळा दाबून हत्या

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

(Pune Man killed inside Manjari Crematorium two detained)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.