कामधंदे नाही, नवनव्या गाड्या फिरवून शायनिंग मारायचे, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

जुन्नर तालुक्यातील खोडद गावात काही तरुण काहीच कामधंदे करायचे नाहीत. मात्र, तरीदेखील ऐटीत गावात आणि तालुक्यात मोटारसायकलवर फिरायचे (Pune Police arrest bike thieves).

कामधंदे नाही, नवनव्या गाड्या फिरवून शायनिंग मारायचे, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड
प्रातिनिधिक फोटो

पुणे : जुन्नर तालुक्यातील खोडद गावात काही तरुण काहीच कामधंदे करायचे नाहीत. मात्र, तरीदेखील ऐटीत गावात आणि तालुक्यात मोटारसायकलवर फिरायचे. ते रोज नवनव्या गाड्यांवर दिसायचे. ते रोज वेगवेगळ्या गाड्यांवर संपूर्ण तालुक्यात फिरायचे. संबंधित तरुण काहीही काम करत नाही. मग त्यांच्याजवळ इतक्या मोटरसायकल आल्या कशा? असा सवाल स्थानिकांना पडायचा. मात्र, कुणीही त्या प्रश्नाच्या खोलवर जायचं नाही. तरीही याबाबत चर्चा जरुर राहायच्या. अखेर या चर्चा पुणे ग्रामीण पोलिसांच्या कानी पडल्या. त्यानंतर सुरु झाली एक नवी तपास मोहीम (Pune Police arrest bike thieves).

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर पार्क केलेली बाईक काही चोरटे मध्यरात्री पळवून न्यायचे. या अशा घटना वारंवार घडायला लागल्या. पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या तक्रारी जास्त येऊ लागल्या. त्यामुळे पोलीसही चिंतेत पडले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणांचा लवकर छडा लाऊन अट्टल गुन्हेगारांना लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात असा आदेश दिला (Pune Police arrest bike thieves).

पोलिसांनी अखेर आरोपीला पकडलंच

स्थानिक गुन्हे शाखेचं पथक कामाला लागलं. पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कानी जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील तरुणांची माहिती पडली. गुन्हे शाखेचं पथक खोडद गावात गेलं. यावेळी मोटारसायकल चोरट्यांना पोलील आल्याची चाहूल लागली. त्यामुळे ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण अखेर पोलिसांनी सिद्धार्थ रमेश बर्डे (वय 21) या आरोपीला पकडलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला.

11 मोटारसायकल जप्त

पोलिसांनी आरोपीकडून 11 मोटारसायकल जप्त केल्या. या सर्व मोटारसायकलची किंमत ही 4 लाख 10 हजार इतकी आहे. या कारवाईतून पोलिसांनी आठ गुन्हे उघडकीस आणले. तसेच आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोस्टच्या ताब्यात दिले.

हेही वाचा : ऑनलाईन क्लास सुरु असताना कॅमेऱ्यासमोर हस्तमैथून, मुंबई पोलिसांकडून आरोपीला राजस्थानमधून अटक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI