AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याची कुंडली समोर, पुतणीलाही सोडलं नव्हतं

पुण्यातील नसरापूर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 65 वर्षिय व्यक्तीने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली. या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याची कुंडली समोर, पुतणीलाही सोडलं नव्हतं
Pune CrimeImage Credit source: Social Media
| Updated on: May 02, 2026 | 2:51 PM
Share

शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना घडत असल्याचे समोर आले आहे. आता पुण्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी अवघ्या दीड तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घटलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दुपारी ४:३० वाजता पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली आणि ५:१५ च्या सुमारास पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अवघ्या दीड तासात आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप गील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी 65 वर्षांचा असून तो गावातच मजुरीचे काम करायचा. विशेष म्हणजे, या नराधमाची प्रवृत्ती आधीपासूनच गुन्हेगारी स्वरूपाची होती.

-आरोपीवर १९९८ आणि २०१५ मध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल होते.

-यापूर्वी त्याच्यावर पॉक्सो (POCSO) अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले होते.

जुन्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहता, आरोपीची वृत्तीच विकृत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बीएनएस (BNS) कायद्यांतर्गत कारवाई

या प्रकरणी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार आणि हत्या अशा गंभीर कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

जनतेचा आक्रोश आणि पोलिसांचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी सहकार्य केले आणि शांततेत आंदोलन केले. “आम्ही तातडीने तपास करून आरोपीला अटक केली आहे. नागरिकांनी संयम राखावा, आम्ही या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गील यांनी स्पष्ट केले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी