Pimpri Chinchwad crime | अय्यो … पतीने पत्नीला भर रस्त्यात उचलून आपटले ; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jan 06, 2022 | 10:22 AM

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित पती पत्नीचा शोध घेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले. त्यानंतर त्यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान पत्नीला पती विरोधात तक्रार द्यायची आहे का अशी विचारणाही पोलिसांनी केली. मात्र तक्रार देण्यास पत्नीने नकार दिला.

Pimpri Chinchwad crime | अय्यो ... पतीने पत्नीला भर रस्त्यात उचलून आपटले ; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
crime
Follow us on

पिंपरी –   पिंपरी-चिंचवडमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला भर रस्त्यात आपटल्याची धक्कदायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घडलेल्या घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

झाले असे की

पती- पत्नीमध्ये भांडण झाले. याच रागातून पत्नी रस्त्याने चालत चालली असतांना रागावलेला पती तिच्यामागे दुचाकीवर आला. मात्र पत्नी त्यांच्याशी न बोलताच चालत राहिली.  यातून पतीच्या रागाचा पार अधिकच वाढला . यानंतर रागावलेल्या पतीने दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क केली. पळत पत्नीच्या मागे गेला व तिच्या मानगुटीला धरत तिला उचलून जमिनीवर अपटले. परंतु वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने लगेच लोक जमा झाले. मात्र पतीने लगेच सावध होत. तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर काही घडलेच नाही अश्याया अविर्भावात पत्नीही तिथून निघून गेली. या ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी केले समुपदेशन

या घडलेल्या घंटनेचा व्हिडीओ क्लिपसोशल मीडियावर जोरात व्हायरल झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित पती पत्नीचा शोध घेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले. त्यानंतर त्यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान पत्नीला पती विरोधात तक्रार द्यायची आहे का अशी विचारणाही पोलिसांनी केली. मात्र तक्रार देण्यास पत्नीने नकार दिला. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची माहिटी निगडी पोलिसांनी दिली आहे. इतकच नव्हे तर त्या दोघांचेही समुपदेशन करुन त्यांना पोलिसांनी सोडून दिले आहे.

Shilpa Shetty-Raj Kundra | नव्या वर्षात पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने शेअर केला राज कुंद्रासोबतचा व्हिडीओ, जोडीने घेतलं शिर्डीत दर्शन!

CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ

काँग्रेसच्या काही मंत्र्यांवर आमदार नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार : सूत्र