CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ

CCTV | भररस्त्यात अडवून बेदम मारहाण, मग चाकूने भोसकलं, नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ
नांदेडमध्ये युवकाची हत्या

नांदेड शहरातील शारदानगर परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस भर रस्त्यात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार तिथल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

राजीव गिरी

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 06, 2022 | 9:46 AM

नांदेड : भर रस्त्यात एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. ट्रिपल सीट आलेल्या बाईकस्वारांनी तरुणाला बेदम मारहाण करुन चाकूने भोसकल्याचा आरोप आहे. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

युवकाची चाकूने भोसकून हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नांदेड शहरातील शारदानगर परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस भर रस्त्यात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार तिथल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

खासगी फायनास कंपनीत नोकरी करणारा युवक

मयत विशाल धुमाळ हा एका खासगी फायनास कंपनीत नोकरी करत होता. मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात मारेकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस विशालला रस्त्यात थांबवलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

बेदम मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू

तिघंही आरोपी एकाच बाईकवरुन ट्रिपल सीट आले होते. बेदम मारहाण केल्याने विशालचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

नाशकात ITI चे सहसंचालक 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला

नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें