Shilpa Shetty-Raj Kundra | नव्या वर्षात पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने शेअर केला राज कुंद्रासोबतचा व्हिडीओ, जोडीने घेतलं शिर्डीत दर्शन!

Shilpa Shetty-Raj Kundra | नव्या वर्षात पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीने शेअर केला राज कुंद्रासोबतचा व्हिडीओ, जोडीने घेतलं शिर्डीत दर्शन!
Shilpa-Raj

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बुधवारी अभिनेत्रीने पती राज कुंद्रासोबत (Raj Kundra) तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही शिर्डी साईबाबा मंदिरात बाबांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 06, 2022 | 9:04 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बुधवारी अभिनेत्रीने पती राज कुंद्रासोबत (Raj Kundra) तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही शिर्डी साईबाबा मंदिरात बाबांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. पती राज कुंद्रासोबत शिल्पाची नव्या वर्षातील ही पहिली पोस्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिल्पाने राजसोबत एकही पोस्ट शेअर केलेली नाही.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी मरून रंगाचा सूट परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग दागिने आणि काळ्या रंगाचा मास्क घातला आहे. तर, केस मोकळे सोडले आहेत. तर दुसरीकडे राज कुंद्रा याने ग्रे कलरचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. शिल्पा आणि राज दोघेही एकत्र उभे राहून साई बाबांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरी. ओम साई राम.’

पाहा व्हिडीओ :

गेल्या वर्षी शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी मसुरीला गेली होती. शिल्पाने इंस्टाग्रामवर या दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. तिने चाहत्यांना तिच्या सुट्टीची झलक दाखवली. शिल्पा बऱ्याच दिवसांनी राज कुंद्रासोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी मसुरीला गेली होती. येथून अभिनेत्रीने स्वत:चा जिलेबी खातानाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

शिल्पाचा पती राज कुंद्राला गेल्या वर्षी अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्रा यांनी ऑगस्ट 2019 मध्ये अश्लील चित्रपट बनवायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनविले आहेत. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटांच्या माध्यमातून कुंद्रा यांनी मोठी कमाई केली आहे. ती कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. कुंद्रा यांच्या अ‍ॅपसाठी सुमारे 20 लाख लोकांनी सदस्यता घेतली होती.

राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत होते आणि नफ्यात चांगले पैसे ही मिळू लागले होते. वेबसाइटपेक्षा सहज उपलब्ध असल्याने कुंद्रा यांनी अश्लील चित्रपट अपलोड करण्यासाठी अॅप बनवले होते. राजच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने त्याच्यासोबत फोटो शेअर करणं कटाक्षाने टाळलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा शिल्पा पती सोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

आगामी चित्रपटासाठी शिल्पा उत्सुक

वर्क फ्रंटबद्दल बोलयाचे तर, शिल्पा शेट्टीचा शब्बीर खानचा आगामी चित्रपट ‘निकम्मा’मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेठियासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही काळापूर्वी तिचा ‘हंगामा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये पुनरागमन केले होते. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास दाखवू शकला नाही.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें