पुण्याचा गणेश गायकवाड नेमका कोण आहे जो तथाकथित बाबामुळे चर्चेत आलाय

पुण्याच्या औंध येथील प्रसिद्ध उद्योजक आणि काँग्रेस नेता गणेश नानासाहेब गायकवाड हा सध्या चर्चेत आला आहे.

पुण्याचा गणेश गायकवाड नेमका कोण आहे जो तथाकथित बाबामुळे चर्चेत आलाय
रघुनाथ येमुल गुरुजी

पुणे : पुण्याच्या औंध येथील प्रसिद्ध उद्योजक आणि काँग्रेस नेता गणेश नानासाहेब गायकवाड हा सध्या चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत येण्यामागील कारण हे अनपेक्षित असं आहे. त्याने एका राजकीय गुरुच्या सल्ल्यामुळे आपल्या पत्नीचा छळ केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा राजकीय गुरु रघुनाथ येमुल याला अटक केली आहे. तर गणेश गायकवाड हा सध्या फरार आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड याच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याने ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला. गणेश गायकवाड याने आपल्या 27 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. विशेष म्हणजे गणेश गायकवाड याची पत्नी एका माजी आमदारांची मुलगी आहे. तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पण येमुले गुरुच्या सल्ल्यामुळे त्यांच्या संसराचा खेळ खंडोबा झाला.

गणेश नानासाहेब गायकवाड कोण आहे?

गणेश नानासाहेब गायकवाड हा पुण्याच्या औंध परिसरात राहतो. प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे. औंध आणि बाणेर परिसरात त्यांनी अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाईक आहेत.

पोलिसांच्या तपासात येमुलचं कनेक्शन समोर

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला तेव्हा या प्रकरणातील राजकीय गुरू येमुलचं कनेक्शन समोर आलं. येमुल याने गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवदसा असून पांढर्‍या पाय गुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, मी देतो ते लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल, असे पिडितेचा पती गणेशला सांगितले. त्यानंतर पती गणेश याने आपल्या पत्नीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार घडला. यामुळे संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याच्या कारणावरून येमुल गुरूजीस अटक करण्यात आलीय.

येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध

येमुल गुरूजीचे राजकीयपासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी नजीकचे संबंध आहेत. आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्नही करीत होते. त्यामुळे या प्रकरणात अंनिसने उडी घेतली असून कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

कोण आहे राजकीय गुरु रघुनाथ येमूल ज्याला नेत्याच्या बायकोनं कोठडीची हवा खाऊ घातलीय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI