AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला दहा वर्षे झाली, दोन मुलं, पण महिलेची टेरेसवरुन उडी, आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. संबंधित घटना शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

लग्नाला दहा वर्षे झाली, दोन मुलं, पण महिलेची टेरेसवरुन उडी, आत्महत्येमागचं नेमकं कारण काय?
सांकेतिक फोटो
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 23, 2021 | 11:20 PM
Share

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. संबंधित घटना शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. महिलेच्या लग्नाला 10 वर्ष झाले असून तिला 2 मुलं आहेत. तरीही महिलेने आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांकडून महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित

सिंहगड रस्ता परिसरातील एका इमारतीत मृतक महिला राहत होती. सिंहगड रस्त्यावरील एका मॉलजवळ ती इमारत आहे. महिलेने शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास टेरेसवरुन खाली उडी मारली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. महिला गंभीर जखमी झाली होती. घटनास्थळी जमलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तातडीने महिलेला जवळील रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

आत्महत्येमागचं कारण काय? पोलिसांचा तपास सुरु

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या महिलेने नेमकी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या

दुसरीकडे, एका तरुणीने आपल्या कुटुंबियांचा विरोध असताना प्रियकरासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 20 दिवसांत तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतक तरुणीचा पती हा तिच्या मृत्यूनंतर बेपत्ता झाला आहे. त्याच्या वागणुकीमुळेच तरुणीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही दिल्लीच्या पटेल नगर भागात घडली आहे. मृतक तरुणीचं नाव नेहा चौहान असं आहे. तर आरोपी पतीचं राहुल बाथम असं नाव आहे. विशेष म्हणजे मृतक नेहा आणि आरोपी राहुल यांची तीन महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. नेहा शहरातील एका शोरुमजवळील एका खासगी कार्यालयात नोकरी करायची. कार्यायलात येता-जाताना तिची ओळख राहुलसोबत झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

नेहा आणि राहुल यांनी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. पण नेहाच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. पण कुटुंबियांचा रोष पत्कारत नेहाने राहुलसोबत एका मंदिरात लग्न केलं. दोघांचं लग्न 22 ऑगस्ट रोजी झालं. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी राहुलची वागणूक बदलली. तो तिला मारहाण करु लागला. यानंतर पती-पत्नीत वारंवार वाद होऊ लागला. राहुल हा दारु पित असल्याचं नेहाला लग्नानंतर कळालं. राहुलकडून सातत्याने सुरु असलेल्या छळाला कंटाळून नेहाने अखेर 12 सप्टेंबरला आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधीच्या रात्री नेहाचं पती राहुलसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर दोघं घरात झोपले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला जाग आली तेव्हा घरात नेहाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर राहुल फरार झाला.

हेही वाचा :

पोटातील आतड्या घेऊन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यात थरार कॅमेऱ्यात कैद

जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?