पोटातील आतड्या घेऊन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यात थरार कॅमेऱ्यात कैद

पोटातील आतड्या हाताने सावरत चालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना काल (22 ऑक्टोबर) दुपारी ठाण्यातील खारकर आळी या गजबजलेल्या भागात घडली.

पोटातील आतड्या घेऊन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यात थरार कॅमेऱ्यात कैद
पोटातील आतड्या घेऊन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यात थरार कॅमेऱ्यात कैद
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 6:16 PM

ठाणे : पोटातील आतड्या हाताने सावरत चालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना काल (22 ऑक्टोबर) दुपारी ठाण्यातील खारकर आळी या गजबजलेल्या भागात घडली. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खारकर आळी भागात नीलम हाऊसिंग सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि पाणी सोडण्याचे काम करणारा 49 वर्षीय पद्मबहादूर थकोला हा आपल्या कुटुंबासहीत इमारतीच्या खाली एका खोलीत राहतो. त्याच्यासोबतच एक भयानक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

पद्मबहादूर थकोला याच्या गावात राहणारा इंद्रमोहन भारमले बुडा हा ठाण्यात आला होता. तो काल दुपारी पद्मबहादूर याच्या घरी आला. त्याने पद्मबहादूरला आपल्या घरात राहणायला द्यावे, तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. पण पद्मबहादूरने या गोष्टीस नकार दिला. यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की इंद्रमोहनने भाजी कापायचा सुरा पद्मबहादूरच्या पोटात खुपसला.

आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

इंद्रमोहन याने केलेला वार इतका भयानक होता की त्यामुळे पद्मबहादूरच्या पोटातील आतड्याच बाहेर आल्या. या हल्ल्याने पद्मबहादूर जोराने किंचाळला. तो वेदनांनी व्हिव्हळत होता. यावेळी सोसायटीतील काही नागरीक घटनास्थळी दाखल झाले. आपल्या हातून भलीमोठी चूक झालीय हे इंद्रमोहनच्या लक्षात आलं. त्याने वेळेचा विलंब न करता घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तो पद्मबहादूरच्या घरातून बाहेरही पडला. पण इमारतीतून बाहेर पडत असताना सोसायटीतील काही नागरिकांनी त्याला पकडलं.

‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सोसायटीतील स्थानिकांनी या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांकडून इंद्रमोहनला ताब्यत घेत बेड्या ठोकल्या. दुसरीकडे पद्मबहादूरची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. इंद्रमोहनने केलेल्या हल्ल्यामुळे त्याच्या पोटातील आतडे बाहेर लटकताना दिसत होते. तो प्रचंड रक्तबंबाळ झालेला होता. त्याला तातडीने सुरुवातीला चालत नंतर उचलत रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. यावेळी काही स्थानिकांनी त्याला रुग्णालयात घेऊन जातानाचा क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. तेच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पद्मबहादूरची प्रकृती चिंताजनक

पद्मबहादूरला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पद्मबहादूरवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर आरोपी इंद्रमोहन याच्यावर कलम 307 नुसार ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा :

पुण्यातला अपघात स्पॉट, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल मार्ग बनला ‘डेथ झोन’, आतापर्यंत 56 जणांचा बळी

ब्लॅक फंगसने महिलेचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, खचलेल्या निवृत्त जवानाने तीन मुलांना विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.