ब्लॅक फंगसने महिलेचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, खचलेल्या निवृत्त जवानाने तीन मुलांना विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं

बेळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवृत्त जवानाने चार मुलांना विष पाजलं. त्यानंतर स्वत: देखील विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्लॅक फंगसने महिलेचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, खचलेल्या निवृत्त जवानाने तीन मुलांना विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 5:25 PM

बेळगाव : बेळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवृत्त जवानाने चार मुलांना विष पाजलं. त्यानंतर स्वत: देखील विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील एका गावात घडली आहे. मृतांमध्ये निवृत्त जवानासह तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. जिल्ह्यातील नागरिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येमागे नेमकं कारण काय?

या घटनेत आत्महत्या केलेल्या निवृत्त जवानाचं नाव गोपाळ हादीमनी असं आहे. त्याने आपल्या तीन मुलगी आणि एका मुलाला विष पाजून त्यांचं आयुष्य संपवलं. त्यानंतर त्याने स्वत: विष प्राशन करुन आत्महत्या केली. खरंतर गोपाळ यांच्या पत्नी जया यांचं ब्लॅक फंगसने दोन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं होतं. या दु:खातून हे कुटुंब सावरु शकलं नाही. कुटुंबातील सर्वजण जया यांच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेले होते. त्यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या

दुसरीकडे, एका तरुणीने आपल्या कुटुंबियांचा विरोध असताना प्रियकरासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 20 दिवसांत तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतक तरुणीचा पती हा तिच्या मृत्यूनंतर बेपत्ता झाला आहे. त्याच्या वागणुकीमुळेच तरुणीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही दिल्लीच्या पटेल नगर भागात घडली आहे. मृतक तरुणीचं नाव नेहा चौहान असं आहे. तर आरोपी पतीचं राहुल बाथम असं नाव आहे. विशेष म्हणजे मृतक नेहा आणि आरोपी राहुल यांची तीन महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. नेहा शहरातील एका शोरुमजवळील एका खासगी कार्यालयात नोकरी करायची. कार्यायलात येता-जाताना तिची ओळख राहुलसोबत झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

नेहा आणि राहुल यांनी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. पण नेहाच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. पण कुटुंबियांचा रोष पत्कारत नेहाने राहुलसोबत एका मंदिरात लग्न केलं. दोघांचं लग्न 22 ऑगस्ट रोजी झालं. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी राहुलची वागणूक बदलली. तो तिला मारहाण करु लागला. यानंतर पती-पत्नीत वारंवार वाद होऊ लागला. राहुल हा दारु पित असल्याचं नेहाला लग्नानंतर कळालं. राहुलकडून सातत्याने सुरु असलेल्या छळाला कंटाळून नेहाने अखेर 12 सप्टेंबरला आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधीच्या रात्री नेहाचं पती राहुलसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर दोघं घरात झोपले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला जाग आली तेव्हा घरात नेहाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर राहुल फरार झाला.

संबंधित बातम्या :

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.