Pune Firing : पुण्यात पुन्हा गोळीबार, उरूळी कांचनमधील इनामदार वस्तीजवळ थरार

Pune Firing crime news : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील उरूळी कांचन येथे गोळीबाराची घटना समोर आली आहे. कोणी आणि का केला गोळीबार जाणून घ्या.

Pune Firing : पुण्यात पुन्हा गोळीबार, उरूळी कांचनमधील इनामदार वस्तीजवळ थरार
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 4:26 PM

पुण्यातील उरूळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ येथे गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळे याने तीन ते चार जणांवर गोळीबार केल्याची माहिती समजत आहे. या गोळीबारामध्ये काळुराम गोते हे गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

विद्येचे माहेरघर आणि सास्कृतिक राजधानी असलेली पुण्याची ओळख आता संपत चालली आहे. देशासह जगभरातून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. मात्र आता दिवसाढवळ्या अशा गोळीबाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवूनच आता फिरावं लागत आहे. कोण कधी कुठे कोणावरही गोळीबार किंवा कोयत्याने हल्ला करेल काही सांगता येत नाही. आता मागे पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची घराजवळ  निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.  घरातील संपत्तीच्या वादातून त्यांच्या बहिणीच्या पतीने सुपारी देत हत्या केली.

पुण्यातील नाना पेठमधील डोके तालीमजवळ रात्री नऊच्या सुमारास आपल्या भावासोबत उभे असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर 10-12 हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुरूवातील गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने हल्ल करत जागेवरच त्यांना संपवलं. या घटनेला एक महिनाही झाला नाहीतकर उरूळी कांचन येथे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, पुण्यातील गुडांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सव सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.