AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पोलीस फरार गजा मारणेच्या शोधात, मालमत्ता जप्तीसह लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणार

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे फरार झालाय. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आलीय.

पुणे पोलीस फरार गजा मारणेच्या शोधात, मालमत्ता जप्तीसह लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणार
Gajanan Marane Arrest Satara police
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 20, 2021 | 6:46 PM
Share

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे फरार झालाय. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आलीय. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत (Pune Police searching Criminal Gajanan Marane).

पुणे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर पुण्यातील चांदणी चौकात बेकायदेशीर मिरवणूक काढल्याचा, कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत ठरल्याचा आणि त्याला रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना धक्का दिल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच मारणेसह त्याचे साथीदार पोलिसांच्या अटकेच्या भीतीने फरार झाल्याचंही नमूद करण्यात आलंय. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आली असल्याचंही यात सांगण्यात आलं.

संबंधित पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी अचानक छापेमारी सुरु केलीय. तसेच आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मारणेच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार आहे.

गजा मारणे रॅलीबाबत पोलिसांना जाब विचारलाय : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “गजा मारणे रॅलीबाबत पोलिसांना जाब विचारलेला आहे. पोलिसांचा अहवाल आल्यावर आरोपींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल. चौकटीमध्ये राहूनच सर्वांनी जे करायचं ते करायला हवं.”

दरम्यान, कुख्यात गुंड गजानन मारणे याला आधी शिवाजीनगर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मारणे आणि त्याच्या साथीदारांना सोडण्यात आलं होतं. मारणेने तळोजा जेलमधून सुटल्यावर 40 पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मिरवणूक काढत पुणे शहरात प्रवेश केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दुसरीकडे रस्त्यात कोणत्याही पोलिसांनी गजा मारणेला का अडकलं नाही? असा गजानन मारणेच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय घडलं होतं?

कुख्यात गुंड गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.(Pune police arrest goon Gajanan Marne)

तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन काढली मिरवणूक

सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे.(Pune police arrest goon Gajanan Marne)

हेही वाचा :

गजानन मारणेपाठोपाठ आता शरद मोहोळविरोधातही गुन्हा दाखल

VIDEO| गजा मारणेची तळोजा कारागृहातून मुक्तता; मारणे टोळीचा मिरवणूक काढून जल्लोष

VIDEO | गुंड गजानन मारणेच्या साथीदारांचा एक्स्प्रेस वेवर हलकल्लोळ, पोलिसांनी ड्रोन जप्त करताच पळापळ

व्हिडीओ पाहा :

Pune Police searching Criminal Gajanan Marane

Follow Us
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....