AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porsche Accident : हिट अँड रन केसमध्ये मोठी अपडेट, पुणे पोलिसांचा अहवाल तयार, दोन डॉक्टरांना…

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन केसमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या अपघाताला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी कसून प्रयत्न केले. अपघात झाल्यानंतर मुलाचे रक्त नमुने बदलण्यात आल्याचा आरोप झाला.

Pune Porsche Accident : हिट अँड रन केसमध्ये मोठी अपडेट, पुणे पोलिसांचा अहवाल तयार, दोन डॉक्टरांना...
| Updated on: May 29, 2024 | 10:36 AM
Share

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन केसमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या अपघाताला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी कसून प्रयत्न केले. अपघात झाल्यानंतर मुलाचे रक्त नमुने बदलण्यात आले होते. त्यासाठी त्याच्या वडिलांनी ससूनमधल्या डॉक्टरांना फोनवर फोन केल्याचेही समोर आले. डॉक्टरांवर दबाव टाकण्यात आला तसेच त्यांना तीन लाख रुपयेही देण्यात आले. ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटातील ससूनमधील आरोपी डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली होती.

आता याप्रककरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ससून प्रकरणात दोषी असलेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबीत करा असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागासमोर ठेवला आहे. ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटातील आरोपी डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला आहे. त्चयाप्रमाणे त्यांच्यावरील गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची एसीबी कडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाबाबत लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान याप्रकरणाचा तपास सुरू असून मंगळवारी पोलिसांकडून डॉक्टर तावरेच्या घराची झडती घेण्यात आली. डॉ. तावरे हा कॅम्प परिसरात राहतो. त्याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रं आणि साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलांच्या मित्रांचाही जबाब नोंदवला

दरम्यान ज्या रात्री कल्याणीनगरमध्ये हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलासोबत त्याचे दोन मित्रही होते. त्यांचा काल (मंगळवार) संध्याकाळी पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला. अपघाता वेळी कार मध्ये उपस्थित असणाऱ्या अल्पवयीन मित्रांचा पुणे पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवला. तब्बल २ तास त्यांचा जबाब नोंदवण्यात येत होता. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांकडून त्या दिवशी घडलेल्या घटनेची संपूर्ण, सविस्तर हकीकत जाणून घेतली असून त्यांच्या जबाबातून अनेक महत्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, अल्पवयीन आरोपीने दिली होती ऑफर

कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारचा भीषण अपघात झाला.या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीने उपस्थितांना पैसे ऑफर केल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी अमिन शेख यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. जेव्हा अपघात झाला तेव्हा लोक त्या कारमधल्या मुलांना मारू लागले. तेव्हा त्या मुलांनी मारणाऱ्या लोकांना पैशांची ऑफर दिली. तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, पण आम्हाला मारू नका, असं त्या मुलांनी सांगितल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.