AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porsche accident : बापरे, आरोपीने 90 मिनिटात पहिल्या पबमध्ये उडवले 48 हजार रुपये, पुणे हिट अँड रन प्रकरण

Pune Porsche accident : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे नागरिकांच्या मनात संतापाची भावना आहे. शनिवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. आरोपी एका बड्या बिल्डरचा मुलगा आहे. त्याने आपल्या आलिशान पोर्शे टायकन कारने एका दुचाकीला उडवलं. यात दोघांनी आपले प्राण गमावले.

Pune Porsche accident : बापरे, आरोपीने 90 मिनिटात पहिल्या पबमध्ये उडवले 48 हजार रुपये, पुणे हिट अँड रन प्रकरण
Pune Vendant Agarval Accident Case CCTV Footage
| Updated on: May 22, 2024 | 8:13 AM
Share

पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यातील वातवरण तापलं आहे. या बाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने आपल्या आलिशान पोर्शे टायकन कारने एका दुचाकीला उडवलं. यात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. आरोपी अल्पवयीन असून अपघाताच्यावेळी तो दारुच्या नशेत होता. या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्याने वातावरण आणखी तापलं. आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे. जेणेकरुन इतरांना जरब बसावी. पोर्शे कारने दुचाकीला उडवण्याधी आरोपी वेदांत अग्रवाल दोन पबमध्ये गेला होता. तिथे त्याने मद्यप्राशन केले. आरोपीने पबमध्ये किती पैसे उडवले, त्याची माहिती आता समोर आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. आरोपीने पहिल्या पबमध्ये 90 मिनिटात तब्बल 48 हजार रुपये उडवले. शनिवारी रात्री 10.48 च्या सुमारास आरोपी या पबमध्ये गेला. ब्लाक मॅरियट या दुसऱ्या पबमधून तो रात्री 12.10 च्या सुमारास बाहेर पडला. आरोपीने 48 हजार रुपये बिल पेड केलं, ते बिल पुणे पोलिसांनी मिळवलं आहे. या बिलमध्ये आरोपी आणि त्याच्या मित्रांना जी दारु देण्यात आली, त्याचा सुद्धा समावेश आहे.

ब्लड सॅम्पल रिपोर्ट्ची प्रतिक्षा

“अल्पवयीन आरोपी दोन पबमध्ये गेला. गाडी चालवण्याआधी त्याने मद्यप्राशन केल्याच सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. ब्लड सॅम्पल रिपोर्ट्ची प्रतिक्षा आहे” असं एसीपी मनोज पाटील यांनी सांगितलं. या प्रकरणात आरोपीला सहज जामीन मिळाल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. त्याला पोर्शे कार त्याच्या वडिलांनी दिली होती. काल आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली. आज पुणे पोलीस मुलगा आणि वडील दोघांना कोर्टात हजर करतील.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.