AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक, पुण्यात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, डॉ. अजय तावरेला अटक

Pune Porsche Accident : पुण्यात बड्या बिल्डरच्या मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने दोघांना उडवलं. यात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी वाट्टेल ते सुरु आहे. ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबच्या HOD ला अटक झाली आहे. त्यांच्या चौकशीतून अजून धक्कादायक माहित समोर येईल.

भयानक, पुण्यात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, डॉ. अजय तावरेला अटक
Pune Porsche Accident case
| Updated on: May 27, 2024 | 9:10 AM
Share

पुणे हिट अँड रन प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून नियमबाह्य सर्व गोष्टी केल्या जात आहेत. वाट्टेल त्या थराला जाऊन आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन आरोपीचा गुन्हा आपल्या डोक्यावर घ्यावा, म्हणून ड्रायव्हरला आमिष दाखवलं, त्याला डांबून ठेवल्याच समोर आलं. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आता अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्मध्ये फेरफार केल्याच समोर आलय. या प्रकरणी डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे. डॉ. अजय तावरे हे सध्या ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक लॅबचे HOD आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

घटनेच्यावेळी अल्पवयीन आरोपी त्याची आलिशान पोर्शे कार चालवत होता. त्याने पुण्याच्या कल्याणीनगर भागातील अरुंद रस्त्यावर भरधाव वेगात पोर्शे चालवून दुचाकीवर बसलेल्या दोघांना उडवलं. यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. हा गुन्हा करण्याआधी आरोपी दारु प्याला होता. तो दोन पबमध्ये गेला होता. एका पबमध्ये त्याने 48 हजार रुपये उडवले. त्यात दारुच बिल सुद्धा होतं. ते बिल सुद्धा पोलिसांकडे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारु पार्टी करताना दिसला आहे. त्यामुळे त्याचा ब्लड रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. पोलिसांनी अजून त्याचा ब्लड रिपोर्ट काय आहे? त्याची माहिती दिलेली नाही. ब्लड रिपोर्टमधून आरोपीने त्यावेळी मद्य प्राशन केलेले की, नाही? ते समजू शकते. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे.

ड्रायव्हरला मॅनेज करण्याचा प्रयत्न

पण आता ब्लड रिपोर्टमध्येच फेरफार झाल्याची शक्यता दिसत आहे. डॉ. अजय तावरे यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु होईल, त्यावेळी या प्रकरणात अजून धक्कादायक गंभीर बाबी समोर येऊ शकतात. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पडद्यामागे काय-काय चालू आहे? हे यातून दिसतय. याआधी ड्रायव्हरला मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. त्याला बंगला, पैसा, हे आमिष दाखवण्यात आलं. तो ऐकत नाहीय हे लक्षात आल्यावर डांबून ठेवण्यात आलं. हे सगळ खूप भयानक आणि गंभीर आहे. कायद्याला वाकवण्यासाठी काय-काय चाललय ते यातून दिसतं.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.