Dombivali Theft : रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 6 लाख 76 हजाराचे दागिने हस्तगत

या चोरट्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 130 ग्रॅम वजनाचे 6 लाख 76 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे.

Dombivali Theft : रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 6 लाख 76 हजाराचे दागिने हस्तगत
रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 10:42 PM

डोंबिवली : मेल-एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्या (Thieves)ला क्राईम ब्रँचच्या मुंबई युनिटने मोठ्या कौशल्याने जेरबंद (Arrest) करण्यात यश मिळविले आहे. या बदमाशाकडून तब्बल 6 लाख 76 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सुरेंद्र भलेराम धानक (42) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 130 ग्रॅम वजनाचे 6 लाख 76 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे.

एका प्रवाशाच्या दागिने चोरीचा तपास करताना चोरटा जेरबंद

विरार स्टार सिग्नेचर सोसायटीत राहणारे सुरेश सुबराया नायक हे 13 जून रोजी रात्री 9.18 च्या सुमारास उडपी रेल्वे स्टेशनवरुन मँगलोर-उद्यान या स्पेशल गाडीने कुटुंबियांसह प्रवास करत होते. ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वाचारच्या खारबांव रेल्वे स्टेशनजवळ पोहचली. यावेळी कुणीतरी चोरट्याने यांच्या ट्रॉली बॅगेतील 7 लाख 56 हजारांचा ऐवज असलेला सोन्याच्या दागिन्यांचा डबा लंपास केला. याबाबत डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक पोलिसांसह लोहमार्ग क्राईम ब्रँचचे मुंबई युनिट समांतर तपास होते.

ठाणे रेल्वे स्थानकावर सापळा लावून आरोपीला अटक

लोहमार्ग क्राईम ब्रँचचे खासगी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार अशोक होळकर यांनी वरिष्ठांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी वपोनि अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक होळकर, जमादार गजानन शेडगे, हवालदार संदिप गायकवाड, अतुल साळवी, अतुल धायडे, रविंद्र दरेकर, वैभव शिंदे, अमित बडेकर, अनिल खाडे, सतीश धायगुडे, गणेश माने, शशीकांत कुंभार, इम्रान शेख, हरीश संदानशिव, सुनिल मागाडे यांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर सापळा लावला. या सापळ्यात सुरेंद्र धानक या चोरट्याला बेड्या ठोकल्या. (Railway police arrested the thief who stole from the train and seized the jewellery)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.