AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांच्या बैठकीत चोरांनी लांबवला आयफोन, कोणाचे पॉकीट चोरले, कोणाचे पैसे लांबवले

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या बैठकीत भुरटे चोरटे घुसल्याचे स्पष्ट झाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. तसेच अकोला जिल्ह्यातून कोण कोणत्या मतदार संघातून उमेदवार देता येणार? त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

राज ठाकरे यांच्या बैठकीत चोरांनी लांबवला आयफोन, कोणाचे पॉकीट चोरले, कोणाचे पैसे लांबवले
राज ठाकरे लवकरच अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत.
| Updated on: Aug 26, 2024 | 4:52 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते. अकोल्यात असताना त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत चोरट्यांनी हात साफ केले. चोरट्यांनी मनसेचे शहराध्यक्ष राकेश शर्मा आणि आणि जिल्हाध्यक्ष राजेश काळे त्यांचा खिसा कापला. त्यांच्यासोबत आलेल्या सुरक्षा रक्षकांचा आयफोन लांबवला. यामुळे या बैठकीपेक्षा चोरट्यांनी केलेल्या सफाईची चर्चा सुरु होती. राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध उमेदवार देणार असल्याचे या दौऱ्यात सांगितले होते.

जय मालोकार यांच्या परिवाराची घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे अकोल्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचे 31 जुलै रोज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या परिवाराची राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी शुभ मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत चोरट्यांनी सफाई सुरु केली.

चोरट्यांनी काय काय लांबवले?

  • मनसे शहर अध्यक्ष राकेश शर्मा यांचा खिशा कापून 11 हजार रुपए लांबवले
  • जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांचा खिशा कापून 7 हजार रुपये चोरले.
  • राज ठाकरे यांच्यासोबत आलेल्या सुरक्षा रक्षकाचा आयफोन लंपास केला.

राज ठाकरे यांच्या बैठकीत भुरटे चोरटे घुसल्याचे स्पष्ट झाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. तसेच अकोला जिल्ह्यातून कोण कोणत्या मतदार संघातून उमेदवार देता येणार? त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.