Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीचा हा खास शौक सोनमला समजला आणि तिने त्याचाच फायदा उचलला
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीचा एक खास शौक सोनमला समजला आणि त्याचाच सोनमने फायदा उचलला. राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने ही माहिती दिली. लग्नाला महिना होण्याआधीच पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनवर असताना पतीची क्रूर पद्धतीने हत्या घडवून आणली. राजा रघुवंशीची ही आवड सोनमने शस्त्रासारखी वापरली.

इंदूरच्या राजा रघुवंशीची मेघालयमध्ये क्रूर हत्या झाली. लग्नाला महिना होण्याआधीच पत्नी सोनम रघुवंशीने ही हत्या घडवून आणली. सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह या हत्येचे मास्टरमाइंड आहेत. दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. मेघालय पोलिसांची SIT ची टीम आता दोघांना आमने-सामने बसवून चौकशी करेल. त्यासाठी त्यांनी 25 प्रश्नांची यादी तयार केली आहे. या हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या दरम्यान राजाचा भाऊ विपिनने सोनमबद्दल एक नवीन खुलासा केलाय.
विपिनच्या मते, सोनमने राजा रघुवंशीच्या एका शौकाचा फायदा उचलला. राजा रघुवंशीची ही आवड सोनमने शस्त्रासारखी वापरली. त्याच्याच आधारे तिने राजाची हत्या केली. विपिनने सांगितलं की, राजाला ट्रॅकिंगची आवड होती. ही गोष्ट सोनमला माहित होती. बस त्याचाच वापर करुन सोनम माझ्या भावाला मेघालयला घेऊन गेली, असा दावा विपिनने केला आहे. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तिघांच्या मदतीने राजा रघुवंशीला संपवलं.
‘मी राजाशी संबंध बनवू शकत नाही’
लग्नाच्या शॉपिंग दरम्यानही सोनम राज कुशवाहच्या संपर्कात होती. चॅटिंगमधून ही माहिती मिळाल्याच राजाच्या भावाने सांगितलं. लग्नानंतर राजाला संपवायच ठरलेलं. कामाख्या देवीच्या मंदिरात सोनमने एकही फोटो काढला नाही. राजा ते सगळ करत गेला, जे सोनम सांगत होती. विपिन रघुवंशीनुसार 13 मे रोजी राजाच्या हत्येच प्लानिंग सुरु झालेलं. सोनम आणि राज कुशवाहमध्ये चॅटिंग झालं. रात्री 3 वाजता चॅटिंगमध्ये लिहिलेलं की. टॉर्चरमुळे मी थकलीय. मी मरुन किंवा तू त्याला मारुन टाकं. मी राजाशी संबंध बनवू शकत नाही. मला गिल्टी फिल होतय, मारुन टाक त्याला. राजने उत्तर दिलं, हो करतो.
ती इमोशनल होण्याचा ड्रामा करतेय
मग, प्लानुसार सोनम जबरदस्ती राजाला हनिमूसाठी शिलॉन्गला घेऊन गेली. तिथे तिने सुपारी किलर्स सोबत मिळून राजाची हत्या केली. त्याचा मृतदेह दरीत फेकला. त्यानंतर आरोपींसोबत फरार झाली. आतापर्यंत झालेल्या तपासात या हत्याकांडचा खरा मास्टरमाइंड कोण? हे SIT ला स्पष्ट करता आलेलं नाही. शिलॉन्गचे डीआयजी डीएनआर मारक यांच्यानुसार सोनम तपासात चुकीची माहिती सुद्धा देत आहे. लॉकअपमध्ये अनेकदा ती इमोशनल होण्याचा ड्रामा करत आहे. ती सर्व आरोप राज कुशवाहवर टाकतेय आणि राज कुशवाह सोनमला हत्येचा मास्टरमाइंड सांगतोय.