AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येआधी काय घडलं ? अखेरच्या क्षणांचा व्हिडीओ समोर..

Raja Raghuvanshi Last Video Viral : देशातील बहुचर्चित राजा रघुवंशी हत्याकांडाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राजाच्या हत्येपूर्वीचा आहे. राजाच्या हत्येपूर्वी काही क्षण आधीच हे दोघेही एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. यामध्ये सोनम पांढरा टी-शर्ट घालून पुढे चालताना दिसत होती. तर राजा ...

Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येआधी काय घडलं ?  अखेरच्या क्षणांचा व्हिडीओ समोर..
राजा रघुवंशी हत्याकांड
| Updated on: Jun 16, 2025 | 11:20 AM
Share

इंदौरमधील राजा रघुवंशी याच्या हत्येला आता 24 दिवस उलटले आहेत. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासह पाचही आरोपी सध्या या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतात. आता याच दरम्यान, राजाच्या हत्येपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये राजा आणि सोनम हे दोघेही तेथील एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाले, तेव्हा ते दोघे ट्रेकिंग करत होते. राजा आणि सोनम दोघेही ट्रेकला जात होते. त्याच वेळी एक पर्यटक व्हिडिओ बनवत होता. राजा आणि सोनम देखील त्याच्या कॅमेऱ्यात कॅप्चर झाले. राज्याच्या हत्येच्या काही काळ आधीचाच हा व्हिडीओ असून त्याचे अखेरचे काही क्षण त्यात कैद झाले.

या व्हिडिओमध्ये सोनम पुढे चालताना दिसत होती तर राजा तिच्या मागे होता. तेव्हा सोनमने पूर्ण हातांचा पांढरा टी-शर्ट तर राजानेही पांढरा स्लीव्हलेस टी-शर्ट घातला होता. खरंतर, शिलाँग फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर दावा केला आहे की, डबल डेकर ब्रिजच्या प्रवासादरम्यान तो जेव्हा व्हिडिओ बनवत होता, तेव्हाच राजा आणि सोनम रघुवंशी हे दोघेही त्याच्या फ्रेममध्ये कैद झाले होते. दोघेही वरच्या दिशेने जात होते. तेव्हा सोनमने जो पांढरा फुल्ल हातांचा शर्ट घातला होता, तोच नंतर राजा रघुवंशीच्या मृतदेहाशेजारी सापडला, असा दावा केला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Dev (@m_devsingh)

पर्ययटकाने शेअर केला व्हिडीओ

देव सिंह नावाच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 23 मे 2025 रोजी मी मेघालय डबल डेकर रूट ब्रिजच्या सहलीला गेलो होतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. काल मी तो व्हिडिओ पाहत होतो आणि तेव्हाच मला इंदौरमधील त्या जोडप्याचे रेकॉर्डिंग सापडले. सकाळे 9: 45 झाले होते, आम्ही खाली जात होतो तेव्हा आणि नोगरीट गावात रात्र घालवून राजा-सोनम वरच्या दिशेने जात होते. मला वाटतं की हे या दोघांचे शेवटचे रेकॉर्डिंग होते. या मृतदेहाशेजारी सापडला तोच पांढरा शर्ट सोनमने घातला होता. मला आशा आहे की यामुळे मेघालय पोलिसांनाही हे प्रकरण सोडवण्यास मदत होईल, असे त्या पर्यटकाने या व्हिडीओसबोत लिहीलं आहे.

कसा दिसत होता राजा ?

देव सिंहने व्हिडिओमध्ये राजा रघुवंशीबद्दलही लिहीलं आहे. ” आता मी जेव्हा व्हिडीओमध्ये राजाला पाहिलं तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. तो अगदी साधा, सामान्य दिसत होता. पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती ” असंही त्याने पोस्टमध्ये नमूद केलं. माझ्याकडे आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये इंदूरमधील आणखी 3 लोक देखील दिसत आहेत, ज्यांनी या दोघांच्या 20 मिनिटे आधी प्रवास सुरू केला आणि पोलिसांनी त्यांना पकडले, असेही त्याने लिहीलं. याप्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.