महिला कर्मचारी पुरुष अधिकाऱ्याला लिपिस्टिक लावायची, नटवायची मग तो…सरकारी कार्यालयातील रासलीलेचा धक्कादायक प्रकार
सरकारी ऑफिसमधील पुरुष आणि महिला अधिकाऱ्याचं विचित्र कृत्य समोर आलं आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे.

Roadways officer dance viral : दोन प्रशासनिक अधिकाऱ्यांचा सरकारी कार्यालयातील रासलीलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचताच प्रशासन एक्टिव झालं. दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आलं. हा व्हिडिओ समोर येताच लोकांमध्ये चर्चा झाली. अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सोशल मीडियावर अधिकाऱ्यांच्या या हरकती दिसताच लोकांनी खिल्ली उडवली. मस्करीचा विषय बनला. राजस्थान रोडवेजच्या भरतपूर डेपोमधील लोहागड डेपो कार्यालयात हे दोन प्रशासनिक अधिकारी तैनात होते. सुनील कुमार आणि गायत्री देवी अशी या दोन प्रशासनिक अधिकाऱ्यांची नावं आहेत. हे दोघे ऑफिसमध्ये शृंगार करतात, डान्स करतात आणि गाणी गातात. व्हिडिओमध्ये महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्याचा शृंगार करताना दिसते.
राजस्थान रोडवेजचे दोन प्रशासनिक अधिकारी सुनील कुमार आणि गायत्री देवी आपल्या कार्यालयात डान्स करताना, गाणी गाऊन रासलीला करताना दिसतायत. सुनील कुमार भरतपूर डेपोत प्रशासनिक अधिकारी पदावर तैनात आहेत. गायत्री देवी लोहागढ डेपोत प्रशासनिक अधिकारी आहेत. दोघांची कार्यालय ऐकमेकांच्या जवळ आहेत.
पुरुष अधिकाऱ्याचा मेकअप
व्हायरल व्हिडिओमध्ये सुनील कुमार गाणं गाऊन डान्स करताना दिसतात. सहअधिकारी गायत्री देवी त्यांचा व्हिडिओ बनवतायत. दुसऱ्या व्हिडिओत गायत्री देवी सुनील कुमार यांच्या डोक्यावर ओढणी टाकतायत. डोक्याला टिळा लावून लिपस्टिक लावताना दिसतात. दोन्ही अधिकारी रासलीला करताना दिसतायत.
दोघांवर कारवाई काय?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उप सहायक महाव्यवस्थापक राजस्थान रोडवेजने 10 नोव्हेंबर रोजी दोघांना तात्काळ प्रभावाने कार्यमुक्त करत एपीओ केलं. सध्या दोघांविरोधात प्रशासनिक कारवाई सुरु आहे. दोघा अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई देखील सुरु आहे. या घटनेने विभागीय मर्यादा आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
