Newly Married : हनीमूनच्या रात्री नव्या नवरीने असं गिफ्ट दिलं की, नवरदेव शॉकमध्ये
Newly Married : मधुचंद्राची रात्र प्रत्येक विवाहित जोडप्याच्या आयुष्यात खास असते. पण जयवीरला हनीमूनच्या रात्री नव्या नवरीकडून जे गिफ्ट मिळालं, ते तो कधीच आयुष्यभर विसरु शकणार नाही.

लग्नाच्या नावावर फसवणुकीच्या घटना सध्या सर्रास घडत असतात. कुठलही राज्य असतो, लग्न होऊन घरात आलेल्या नवरीने लुटमार केल्याच आपण ऐकतो. राजस्थानच्या श्रीगंगानगर असचं एक प्रकरण समोर आलय. नव्या नवरीने हनीमूनच्या रात्री नवरदेवाला फसवून नशेचा पदार्थ प्यायला लावला. मग, रात्रीच्या अंधारात घरातून सगळे दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली. मुन्दडिया भागातील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्नासाठी दोन लाख रुपये मोजले. तो लग्न करुन मुलीला घरी घेऊन आला. तिच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न बघत होता. पण मधुचंद्राच्या रात्री नवरदेवासोबत कांड झाला.
नवरीने नवरदेवाला नशेचा पदार्थ प्यायला लावला. त्याच रात्री ती घरातून सोने, चांदीचे दागिने, एक लाख रुपये रोख आणि अन्य किंमती सामान घेऊन पसार झाली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली पैसे घेणारा व्यक्ती आणि महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
परिचिताच्या माध्यमातून स्थळ आलं
मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय जयवीरने पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार तो अविवाहित होता. कुटुंबीय त्यांच्यासाठी मुलगी शोधत होते. एका परिचिताच्या माध्यमातून स्थळ आलं. 18 फेब्रुवारी 2025 रोजी सुरेश मील स्थळ घेऊन आले. मुलीच नाव संगिता कुमारी म्हणून त्यांनी सांगितलं. ती बिहार अरजनपूरची निवासी होती. लग्नासाठी जयवीरकडे 2 लाखाची मागणी करण्यात आली.
तिची आधार कार्ड कॉपी पाठवली
सुरेशी मील यांनी संगिता कुमारीचे त्यांच्या मोबाइलमध्ये असलेले फोटो दाखवले. तिची आधार कार्ड कॉपी Whatsapp केली. जयवीरच लग्न संगिता कुमारीसोबत झालं. जयवीरने सांगितलं की, 5 फेब्रुवारी 2025 रोजी संगिता कुमारीने रात्री त्याला नशेचा पदार्थ पाजला. त्यानंतर घरात लुटमार करुन पसार झाली.