‘रिक्षाचालकाचा बनाव, पोलिसांकडून चालढकल’, रायगडमध्ये आदिवासी महिलेचा बलात्कार आणि खून

रायगडमधील खालापूर तालुक्यात एका विटभट्टी कामगार असलेल्या आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली

'रिक्षाचालकाचा बनाव, पोलिसांकडून चालढकल', रायगडमध्ये आदिवासी महिलेचा बलात्कार आणि खून
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 11:04 PM

रायगड : महिलांवरील अत्याचारानंतर त्याची दखलही घ्यायला सरकारी यंत्रणा कुचकामी ठरतात. अनेकदा तर असे गुन्हे दडपण्यासाठीही प्रयत्न होतात. अशीच एक धक्कादायक घटना रायगडमधील खालापूर तालुक्यात घडलीय. या ठिकाणी एका विटभट्टी कामगार असलेल्या आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली (Rape and Murder of a tribal woman in Khalapur Raigad).

विशेष म्हणजे या घटनेनंतर या प्रकरणाची FIR देण्यास गेलेल्या नातेवाईकांची तक्रार घेण्यासही पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. अखेर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन आशा सुभाष आणि इतर सजग नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलीय. पीडित महिलेवर 31 मार्च रोजी दुपारी बलात्कार करण्यात आला. एका रिक्षाचालकाने हे कृत्य केल्याचा संशय आहे.

नेमकी घटना काय?

पीडित महिला (वय 42) घरी लग्न असल्याने आपल्या नवऱ्याला वीटभट्टीवरुन आणण्यासाठी सकाळी 10 च्या दरम्यान जवळच्या गावातील रिक्षा भाड्याने घेऊन निघाली. मात्र, ती आपल्या नवऱ्यापर्यंत पोहचलीच नाही. बऱ्याच उशिराने दुपारी 2 च्या दरम्यान संबंधित रिक्षाचालक वीटभट्टीवर तिच्या नवऱ्याकडे गेला. तुझी बायको तुला न्यायला आली आहे आणि मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल असं तो म्हणाला.

नवरा जेव्हा 100 मीटर अंतरावरील पुलाखाली पोहोचला तेव्हा त्याला कडेच्या झुडुपात बायको बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. पीडितेच्या नवऱ्याने त्या रिक्षा चालकास बायकोला दवाखान्यात नेऊ असे म्हटले. मात्र रिक्षा चालकाने मला काम आहे सांगून तिथून पळ काढला. त्यानंतर पीडितेला वीटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेण्यात आले. या ठिकाणी महिला मृत असल्याचे निष्पन्न झाले.

‘गावातील सजग महिलांमुळे बलात्काराची घटना उघड’

पीडितेच्या नवऱ्याने तिला हेमडी या गावी अंत्यसंस्कारासाठी आणले. मात्र गावातील महिलांनी मृत महिलेस तपासले असता तिच्या अंगावर अंतर्वस्त्रे नव्हती, गुप्तांगाला सूज आलेली होती आणि विर्यसदृश्य द्रव तिथे सांडल्याचे आढळले. तसेच अंगावरील साडी नेसली नसून गुंडाळलेली दिसली. यावरून बलात्कार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे कृत्य रिक्षावाल्यानेच केल्याचा संशय आला.

पोलिसांकडून महिला चक्कर येऊन मृत पावल्याची नोंद

यानंतर रात्री 10 वाजता पीडितेचा पती आणि इतर लोक महिलेला घेऊन पोस्टमार्टमसाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. मात्र, डॉक्टर नसल्याने त्यांना सकाळी 9 वाजता या असे सांगण्यात आले. त्याचवेळी ते खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले. मात्र, पोलिसांनी बलात्कार व खून अशी FIR दाखल न करता महिला चक्कर येऊन मृत पावली असा Accidental death report लिहून घेतला.

‘पोलिसांकडून FIR करण्यास टाळाटाळ, पोस्टमार्टमलाही चालढकल’

अखेर सामाजिक कार्यकर्ते सचिन आशा सुभाष यांनी 1 एप्रिल रोजी पीडितेच्या कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरं दिली. अखेर गावकऱ्यांनी तक्रार दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलीस FIR घ्यायला तयार झाले. हे सगळं होईपर्यंत दुपारी 1 वाजले होते. मृत्यू होऊन 24 तास आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह दवाखान्यात आणून 14 तास उलटले. त्यानंतरही सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी डॉक्टर हजर नव्हते.

‘मृत्यू होईन 24 तास उलटून गेल्याने शरीर फुगून त्यात अळ्या’

अखेर पेण येथील काँग्रेस पदाधिकारी नंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा करत पोस्टमार्टम करुन घेतला. “मृत्यू होईन 24 तास उलटून गेल्याने शरीर फुगून त्यात अळ्या पडल्या होत्या आणि प्रचंड वास सुटला होता,” अशी माहिती म्हात्रे यांनी दिली. या घटनेवर बोलताना सचिन आशा सुभाष म्हणाले, “जेव्हा इतर ठिकाणी बलात्कार होतात तेव्हा मोर्चे निघतात, बातम्या होतात पण इथे एका आदिवासी महिलेचा बलात्कार होऊन खून झाला तरी साधा गावचा सरपंच, पोलीस पाटील देखील अंत्यसंस्काराला नसतो ही लाजिरवाणी बाब आहे. मीडिया तर सोडा पण सोशल मीडियावर देखील याविषयी काहीच चर्चा होत नाही.”

‘आदिवासी कधी आणि कसा जन्मतो आणि कधी आणि कसा मरतो याकडे कुणाचंच लक्ष नाही’

“आदिवासी कधी आणि कसा जन्मतो आणि कधी आणि कसा मरतो याकडे कुणाचंच लक्ष नसतं हे दुर्दैवाने वास्तव आहे. साधा FIR व्हायला 18 तास वाट पाहायला लागते तर न्याय मिळणं खूप अवघड बाब आहे. आम्ही मदतीला गेलो नसतो तर हे प्रकरण FIR न होताच चक्कर येऊन मृत्यू जाहीर करून निकाली निघालं असतं. तसेच गुन्हेगार अजून एक बलात्कार आणि खून करायला मोकाट सुटला असता. ज्याच्या पाठीमागे कोणी नाही त्याच्या पाठीमागे व्यवस्था पण नाही हे वास्तव आहे,” असंही सचिना आशा सुभाष यांनी नमूद केलं.

‘साहेब, आम्ही पण माणसंच आहोत, पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नीट वागणूक मिळावी’

या प्रकरणाची तक्रार दाखल करायला गेलेल्या एका कातकरी समाजाच्या नागरिकाने यावेळी पोलिसांच्या केबिनमधून बाहेर निघताना पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून “साहेब, एक विनंती आहे आम्हा आदिवासी लोकांना पोलीस स्टेशनात नीट वागणूक मिळत नाही. आम्ही पण माणसंच आहोत आम्हाला नीट वागणूक मिळावी” अशी विनंती केली. त्यावर हसत एका अधिकाऱ्याने “काय करणार, सगळ्या महाराष्ट्रात असंच आहे” असं म्हणत उत्तर दिल्याची माहिती सचिन आशा सुभाष यांनी दिली.

हेही वाचा :

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

मित्राच्या गर्लफ्रेण्डला दारु पाजून बलात्कार, नागपुरात तरुणाला बेड्या

संतापजनक ! बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी आख्ख्या गावात धींड काढली

व्हिडीओ पाहा :

Rape and Murder of a tribal woman in Khalapur Raigad

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.