मित्राच्या गर्लफ्रेण्डला दारु पाजून बलात्कार, नागपुरात तरुणाला बेड्या

पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर अजनी पोलिसांनी आरोपी रोमिओ गोडबोलेला अटक केली (Nagpur Student Raped by Boyfriend's Friend)

मित्राच्या गर्लफ्रेण्डला दारु पाजून बलात्कार, नागपुरात तरुणाला बेड्या
नागपुरात विद्यार्थिनीवर प्रियकराच्या मित्राकडून लैंगिक अत्याचार

नागपूर : नैराश्यातून बाहेर काढण्याच्या आमिषाने आरोपीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारु पाजून तरुणाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी रोमिओ गोडबोलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपी हा पीडितेच्या बॉयफ्रेण्डचा मित्र आहे. (Nagpur Crime Girl Student Allegedly Raped by Boyfriend’s Friend)

नैराश्येतून बाहेर काढण्याचे आश्वासन

नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची घटना घडली आहे. पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर अजनी पोलिसांनी आरोपी रोमिओ गोडबोलेला अटक केली. सर्वात धक्कादायक म्हणजे आरोपी रोमिओ हा पीडित तरुणीच्या प्रियकराचा मित्र असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत आरोपीने तरुणीशी जवळीक साधली आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडित विद्यार्थिनी नागपूरबाहेरील

पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार ती आरोपीला सुमारे एक वर्षांपासून ओळखते. पीडिता ही विद्यार्थिनी असून नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील आहे. त्यामुळे ती नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात भाड्यावर खोली घेऊन राहते. पीडित तरुणीला गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रासले होते. आरोपी रोमिओ गोडबोले याने त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत आरोपीने पीडित तरुणीशी जवळीक साधली.

दारु पाजून लैंगिक अत्याचार

त्यानुसार काल त्याने पीडितेला दारु पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित तरुणी मानसिकरित्या आणखी खचली आहे. तिने लगेचच अजनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी रोमिओ गोडबोले विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली आहे.

…आणि पुण्यातील बर्थडे पार्टी गँगरेपचा छडा लागला

दुसरीकडे, विनापरवाना शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीने चक्क सामूहिक बलात्काराचीही कबुली दिली. पुण्याच्या बर्थडे पार्टीत केलेल्या गँगरेपची कहाणी आरोपीने घडाघडा सांगितल्याने पोलीसही अवाक झाले. पुण्यात एका तरुणाकडे विनापरवाना पिस्टल असल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिटला मिळाली होती. आरोपीला ताब्यात घेऊन तपास करत असताना एका अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप आणि गोळीबार केल्याचं त्याने सांगितलं. जवळ असलेल्या मोबाईलमुळे पीडित मुलगी गोळीबारापासून थोडक्यात बचावली

संबंधित बातम्या :

गुन्हा वेगळाच, घाबरलेल्या आरोपीने पुण्याच्या बर्थडे पार्टीतील गँगरेपची कहाणी घडाघडा सांगितली…

चिप्सवरुन वाद, संसाराच्या ठिकऱ्या, बायकोचे तुकडे करुन कचऱ्यात फेकले!

(Nagpur Crime Girl Student Allegedly Raped by Boyfriend’s Friend)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI