चिप्सवरुन वाद, संसाराच्या ठिकऱ्या, बायकोचे तुकडे करुन कचऱ्यात फेकले!

चिप्सवरुन पती-पत्नीमध्ये वाद होतो. हा वाद इतक्या टोकावर पोहोचतो की पती त्याच्या पत्नीची हत्या करतो. त्यानंतर तो पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्यात फेकतो (Husband Killed wife over argument).

चिप्सवरुन वाद, संसाराच्या ठिकऱ्या, बायकोचे तुकडे करुन कचऱ्यात फेकले!
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 5:12 PM

मँचेस्टर (इंग्लंड) : चिप्सवरुन पती-पत्नीमध्ये वाद होतो. हा वाद इतक्या टोकावर पोहोचतो की पती त्याच्या पत्नीची हत्या करतो. त्यानंतर तो पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्यात फेकतो. संबंधित घटना ही इंग्लंडच्या मँचेस्टर शहरातील स्टॉकपोर्ट भागात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इंग्लंड हादरलं असून जगभरात या घटनेवर चर्चा सुरु आहे. रागात एखादा व्यक्ती कोणत्या टोकाला जाऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (Husband Killed wife over argument).

नेमकं प्रकरण काय?

आरोपी पतीचं नाव थॉमस मॅकन असं आहे. त्याने गेल्यावर्षी 23 मे रोजी आपली पत्नी वॉन हीची हत्या केली होती. त्यांच्यात चिप्सवरुन वाद झाला होता. या क्षुल्लक कारणावरुन थॉमसने तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन आठ पिशव्यांमध्ये ते तुकडे भरले. त्यानंतर त्या सर्व पिशव्या त्याने पार्कात फेकल्या (Husband Killed wife over argument).

शेजारच्या महिलेचा थॉमसला मेसेज

आरोपी थॉमस आणि वॉन यांच्या भांडणाचा आवाज शेजारी राहणाऱ्या महिलेला येत होता. मात्र, अचानक त्यांच्या घरात शांतता पसरल्याने महिला चिंतेत पडली. तिने थॉमसला मेसेज करुन याबाबत विचारलं होतं. त्यावर थॉमसने चिप्सवरुन वाद झाला होता. तो वाद निवळला, असं सांगितलं होतं.

थॉमसकडून पत्नीचा मोबाईल वापरुन ती जिवंत असल्याचं नाटक

थॉमसच्या मुलांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला एका पार्टीसाठी बोलावलं. पण थॉमसने मुलांच्या आईसोबत भांडण झाल्याचं सांगत येऊ शकत नसल्याचं सांगितलं. याशिवाय मुलांची आई घर सोडून निघून गेल्याचं देखील त्याने मुलांना सांगितलं. दुसरीकडे थॉमस हा वॉनचा मोबाईल वापरुन ती जिवंत असल्याचं नाटक करत होता. त्याने आपल्या मुलाला मेसेज करुन पार्टीला तुमचे वडील स्वत:हून येतील, असा मेसेज केला.

या दरम्यान थॉमसच्या एका मुलाच्या लक्षात आलं की, त्याच्या वडिलांच्या जॅकेटमध्ये त्याच्या आईचा मोबाईल आहे. तो आईचा मोबाईल वापरत असल्याचं त्याला माहित पडलं. याबाबत त्याने आपल्या वडिलांना विचारलं तेव्हा थॉमस कारणं देऊ लागला. तुमची आई कारमध्ये मोबाईल विसरली असं त्याने सुरुवातीला त्यांना सांगितलं.

अखेर थॉमसकडून गुन्ह्याची कबूली

दोन दिवस वॉन घरी न आल्याने शेवटी तिच्या मुलांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर लोकांना पार्कात वॉनच्या मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या आठ पिशव्या सापडल्या. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता थॉमस हा दोषी असल्याचं सिद्ध झालं. थॉमस याने स्वत:हून आपला गुन्हा कबूल केला.

कोर्ट थॉमसला काय शिक्षा देणार?

याप्रकरणी कोर्टात खटला सुरु होता. हा खटला आता अंतिम टप्प्यावर आला आहे. दरम्यान, कोर्टात वकिलांनी थॉमस आणि वॉन हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात मैत्रीत होती, असं सांगितलं. याशिवाय त्यांनी 24 वर्षांआधी लग्न केलं होतं. पण काही वर्षांपासून वॉन आणखी एका पुरुषासोबत प्रेमसंबंधात होती. यावरुनच दोघांमध्ये वाद व्हायचा, अशी माहिती वकिलांनी कोर्टात दिली. या प्रकरणी आता कोर्ट थॉमसला काय शिक्षा देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : क्रिकेट विश्वातील तो भयानक काळ, दिल्ली पोलीस डॉन शोधायला गेले, सापडले मॅच फिक्सिंग करणारे मोठमोठे सट्टेबाज

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.