गुन्हा वेगळाच, घाबरलेल्या आरोपीने पुण्याच्या बर्थडे पार्टीतील गँगरेपची कहाणी घडाघडा सांगितली…

गुन्हा वेगळाच, घाबरलेल्या आरोपीने पुण्याच्या बर्थडे पार्टीतील गँगरेपची कहाणी घडाघडा सांगितली...
पुण्यात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

वारजे येथे वाढदिवसाची पार्टी करताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं विनापरवाना शस्त्र प्रकरणातील आरोपीने सांगितलं. (Pune Gangrape birthday party )

अनिश बेंद्रे

|

Mar 30, 2021 | 3:46 PM

पुणे : विनापरवाना शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या आरोपीने चक्क सामूहिक बलात्काराचीही कबुली दिली. पुण्याच्या बर्थडे पार्टीत केलेल्या गँगरेपची कहाणी आरोपीने घडाघडा सांगितल्याने पोलीसही अवाक झाले. पुण्यात एका तरुणाकडे विनापरवाना पिस्टल असल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिटला मिळाली होती. आरोपीला ताब्यात घेऊन तपास करत असताना एका अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप आणि गोळीबार केल्याचं त्याने सांगितलं. जवळ असलेल्या मोबाईलमुळे पीडित मुलगी गोळीबारापासून थोडक्यात बचावली. (Pune Gangrape on 14 year old girl in a birthday party solved when accuse was arrested in different crime)

बर्थडे पार्टीत अल्पवयीन तरुणीवर गँगरेप

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला पुण्यातील सहकार नगर भागातून पुणे पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. त्याचा तपास सुरु असताना आरोपीने चक्क बलात्काराचीही कबुली पोलिसांना दिली. वारजे येथे वाढदिवसाची पार्टी करताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं त्याने सांगितलं.

मोबाईल फुटला, पण जीव वाचला

त्यावेळी आणखी दोघे येत आहेत, म्हणून थांब अन्यथा मारुन टाकेन, असा दम या नराधमांनी पीडित मुलीला भरला होता. मात्र तिने विरोध केल्यानंतर माळ्यावर असलेली पिस्टल काढून आरोपीने मुलीवर गोळीबार केला. मात्र मुलीने हातात असलेला मोबाईल छातीजवळ धरला असल्याने गोळी नेमकी मोबाईलवर लागली. त्यात मोबाईल फुटला. मुलीला किरकोळ दुखापत झाली, पण तिचा जीव वाचला.

पाच आरोपींमध्ये तिघे अल्पवयीन

या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं आहे. त्यात हडपसर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय कृष्णा उर्फ रोहन ओव्हाळ, वारजे माळवाडीतील वीस वर्षीय निरंजन उर्फ निलेश शिंदे या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पॉस्को कायद्या अंतर्गत दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत तातडीने कठोर कारवाई व्हावी यासाठी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देत मागणी केली आहे.

संबंधित बातम्या :

वाढदिवसाला बोलावून 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, पुणे हादरलं!

(Pune Gangrape on 14 year old girl in a birthday party solved when accuse was arrested in different crime)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें