#क्राईम_किस्से : Rizwanur Rahman Death | लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत

आपल्या मुलीने अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबात लग्न केल्याबद्दल प्रियांकाचे वडील अशोक तोडी आणि कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केल्याचा दावा केला जातो. त्यातच रिझवानूर रहमान मुस्लिम असल्याने त्यांची नाराजी वाढल्याचीही चर्चा होती.

#क्राईम_किस्से : Rizwanur Rahman Death | लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत
Rizwanur Rahman, Priyanka Todi
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 8:21 AM

मुंबई : कोलकात्यात राहणारा 30 वर्षीय कॉम्प्युटर ग्राफिक्स प्रशिक्षक रिझवानूर रहमान (Rizwanur Rahman) 21 सप्टेंबर 2007 रोजी रेल्वे रुळांजवळ मृतावस्थेत आढळला होता. सीबीआयच्या तपासानुसार रिझवानूरने आत्महत्या केली असली, तरी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्याची पत्नी प्रियांका तोडीचे (Priyanka Todi) वडील आणि ‘लक्स कोझी’चे मालक अशोक तोडी, काका प्रदीप तोडी, मामा अनिल सरोगी आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात रहमानला आत्महत्येस उद्युक्त केल्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते.

रिजवानूर-प्रियांकाचे प्रेम प्रकरण

रिजवानूर रहमान या मध्यमवर्गीय तरुणाची ओळख लक्स कोझीचे मालक अशोक तोडी यांची 23 वर्षीय कन्या प्रियांका तोडी हिच्याशी झाली. ज्या ग्राफिक्स ट्रेनिंग स्कूलमध्ये रहमान शिकवत होता, तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते, जे त्यांनी आपापल्या कुटुंबांपासून लपवून ठेवले होते.

गुपचूप लग्न

18 ऑगस्ट 2007 रोजी दोघांनी विशेष विवाह कायद्यानुसार गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जाते. या लग्नाला रिझवानूरचे काही जवळचे मित्र आणि सहकारी उपस्थित होते. दोन्ही कुटुंबांना या लग्नाबद्दल माहिती देण्यात आली नव्हती.

ऑगस्टच्या अखेरीस, रिझवानूर रहमानने त्याच्या भावाशी संपर्क साधला आणि आपण गुप्तपणे लग्न केल्याची कबुली दिली. 31 ऑगस्ट रोजी, त्याने प्रियांकाला मुस्लिम वस्तीतल्या छोट्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाच्या घरी आणले. रिझवानूर आणि प्रियंकाने स्वाक्षरी केलेले एक पत्र पोलिसांना पाठवून तिच्या वडिलांकडून दोघांना संरक्षण मागितले होते.

तोडी कुटुंबाची नाराजी

आपल्या मुलीने अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबात लग्न केल्याबद्दल प्रियांकाचे वडील अशोक तोडी आणि कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केल्याचा दावा केला जातो. त्यातच रहमान मुस्लिम असल्याने त्यांची नाराजी वाढली होती.

प्रियांकाला माहेरी पाठवण्याची संमती

8 सप्टेंबर म्हणजेच रहमान-प्रियांकाचे मॅरेज सर्टिफिकेट आल्याच्या आठ दिवसांनी पोलिसांनी रहमानला बोलावून घेतले आणि पत्नी प्रियांकाला किमान एक आठवडा तिच्या पालकांना भेटण्यासाठी माहेरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसं न केल्यास अपहरण आणि विविध आरोपांखाली त्याला अटक होण्याचीही शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली होती.

पोलिसांचं म्हणणं काय होतं

प्रियांका तिच्या पालकांशी जेव्हा फोनवर बोलायची, तेव्हा रिझवान नेहमी तिच्या आजूबाजूला उपस्थित असायचा, आणि त्याच्या उपस्थितीमुळे, प्रियांकावर मानसिक दडपण येत असल्याचा दावा केला जात होता. प्रियांका अतिशय संक्षिप्त वाक्य किंवा होय-नाही इतकीच उत्तरं देत असे. तसंच तिच्या पालकांशीही अत्यंत लहान आवाजात बोलत असे. त्यामुळे तिच्यावर रिझवानचा दबाव असल्याचा संशय व्यक्त होत होता. कदाचित ती रिझवान आणि त्याच्या कुटुंबाला घाबरत असावी, कदाचित ती तिच्या पालकांशी स्पष्टपणे बोलू शकत नव्हती. त्यामुळे प्रियांकाने एक आठवडा तिच्या पालकांच्या घरी राहिले पाहिजे, असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्या काळात ती तिच्या पालकांशी स्पष्टपणे बोलू शकते आणि जे घडले ते समजावून सांगू शकते आणि आपण आनंदात आहोत, हेही त्यांना पटवून देऊ शकते, असे पोलिसांना प्रकर्षाने वाटत होते.

अखेर रहमानने प्रियांकाला तिच्या पालकांना भेटायला देण्यास सहमती दर्शवली, परंतु ती एका आठवड्यानंतर आपल्याकडे परत येईल असं लिहिलेल्या कागदपत्रावर स्वाक्षरी मिळाल्यानंतरच तिला पाठवण्याची अट त्याने ठेवली होती. प्रियांकाच्या काकांनी एका पोलीस साक्षीदारासमोर साध्या कागदावर करार करत स्वाक्षरी केली की प्रियांकाला 15 सप्टेंबर रोजी रहमानच्या घरी परत पाठवले जाईल.

तारीख उलटल्यानंतरही प्रियांका परतली नाही

करारात नमूद तारीख उलटून गेली. जेव्हा 19 सप्टेंबरलाही प्रियांकाला परत पाठवलं नाही, तेव्हा रहमानने पोलिसांनी छळ केल्याचा आरोप करत एका एनजीओकडे काही कागदपत्रे दाखल केली. त्याची डायरी आणि जवळच्या मित्रांशी झालेल्या संभाषणानुसार, तो आपल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर हालचाली देखील करत होता. रहमानने मृत्यूपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेला कथितपणे लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटले होते की, शांततापूर्ण वैवाहिक आयुष्याच्या बदल्यात तो हिंदू धर्म स्वीकारण्यासही तयार आहे.

रहमानचा संशयास्पद मृत्यू

21 सप्टेंबरच्या दुपारी रहमानचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कोलकात्यात रेल्वे रुळाजवळ पडलेला आढळला होता. त्याचे हात छातीवर दुमडलेले होते, तर त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला खोल जखम होती. रहमानच्या मृत्यूनंतर त्याच्या मोबाईलवरुन पाठवलेले काही एसएमएस सार्वजनिक करण्यात आले होते. सासू आणि सासऱ्यांच्या नंबरवर त्याने पाठवलेल्या या कथित मेसेजमध्ये म्हटलं होतं, की स्वतःला संपवण्यापूर्वी माझ्याकडे केवळ पाच-दहा मिनिटांचा अवधी शिल्लक आहे, मला प्रियांकाशी बोलू द्या. मात्र हे एसएमएस रहमानने हिंदीत टाईप केले होते. तो सहसा इंग्रजीत मेसेज करत असल्याचं त्याच्या निकटवर्तीयांनी पोलिसांना सांगितलं, त्यामुळे हे मेसेज नक्की त्यानेच पाठवले होते का, हे सिद्ध झालं नाही.

त्याच्या मृत्यूनंतर, प्रियांका राज्य महिला आयोगाच्या शिष्टमंडळाला भेटली आणि तिने सांगितले की: “माझ्यावर पोलिसांचा कोणताही दबाव नव्हता” आणि “कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने माझ्याशी गैरवर्तन केले नाही”. अखेरीस सीबीआयच्या तपासात असे निष्पन्न झाले की रहमानने आत्महत्या केली होती आणि अशोक तोडी यांच्यावर त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप सीबीआय तपासानंतर करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

अनेक दिवसांच्या पाठलागानंतर बोलण्याचा प्रयत्न, मात्र तेव्हा जे घडलं, त्यामुळे विजय राधिकाच्या जीवावरच उठला

स्कार्फमुळे गोंधळ, नागपूरच्या मोनिका किरणापुरेची 2011 मध्ये गैरसमजातून झालेली हत्या

Non Stop LIVE Update
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.