AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Attack : पंजाब गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला; लाँन्चर जप्त

पोलिसांनी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकाचवेळी समांतर तपास सुरु करून संशयितांची धरपकड सुरु केली आहे. या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

Punjab Attack : पंजाब गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला; लाँन्चर जप्त
नोकरीचं आमिष दाखवून फसवणूकImage Credit source: tv9
| Updated on: May 11, 2022 | 2:01 AM
Share

चंदिगढ : मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (Grenade) फायर करण्यासाठी वापरलेले लाँचर (Launcher) जप्त करण्यात आले आहे. मुख्यालयावर सोमवारी रात्री हल्ला (Attack) केला गेला होता. त्यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडून सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकाचवेळी समांतर तपास सुरु करून संशयितांची धरपकड सुरु केली आहे. या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला आहे. यामागे दहशतवादी संघटनेचा हात आहे का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. पंजाबसह हरियाणातही संशयितांची धरपकड सुरू आहे.

गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाची इमारत उडवण्याचा कट होता!

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावरील हल्ल्यामागील खळबळजनक कटाचा उलगडा झाला आहे. या हल्ल्यासाठी ‘ट्राय नायट्रो टाल्यून’ (टीएनटी) या स्फोटकाचा वापर करण्यात आला. हल्लेखोरांनी मुख्यालयाची इमारत उडवून देण्याचा कट आखला होता. यादरम्यान हल्लेखोराचा निशाणा चुकला आणि स्फोटक खिडकीतून आत जाण्याऐवजी भिंतीवर आदळले. स्फोटक थेट खोलीत गेले असते तर मोठी हानी झाली असती, असे पंजाबचे डीजीपी भावरा यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पंजाब पोलिसांची दोन पथके हरियाणाला गेली असून त्या पथकांमध्ये 15 पोलिस आहेत. मंगळवारी सकाळी निघालेली ही पथके मोहालीला लागून असलेल्या हरियाणाच्या जिल्ह्यांमध्ये छापे टाकत आहेत. यापैकी एका टीमने चंदिगढ-नवी दिल्ली राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हरियाणाच्या भागांवर लक्ष केंद्रित करीत तपास सुरु ठेवला आहे. हल्ला झालेल्या इमारतीत संघटीत गुन्हेगारी नियंत्रण शाखा व दहशतवादविरोधी टास्क फोर्सचेही कार्यालय आहे. त्यामुळे यामागे गँगस्टर्सचाही हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याप्रकरणी अंबाला येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हा हल्ला जवळपास 80 मीटर दूर अंतरावरून केला गेला असावा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

अफगाणिस्तान कनेक्शन असल्याचा संशय

हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांसोबत राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रचंड अ‍ॅक्टीव्ह झाली आहे. हल्ल्यासाठी टीएनटी स्फोटकाचा वापर करण्यात आला आहे. हे स्फोटक विशेषतः अफगाणिस्तानमध्ये वापरण्यात येते. त्यामुळे या हल्ल्यामागेही अफगाणिस्तान कनेक्शन आहे का? यादृष्टीने एनआयएकडून तपास सुरू आहे. या केंद्रीय यंत्रणेचे एक पथक मंगळवारी सकाळीच पंजाबमध्ये दाखल झाले आणि पथकाने तपास सुरु केला.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...