25 लाखाची खंडणी स्वीकारताना RTI कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल

2 कोटीतील 25 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी RTI कार्यकर्त्याला रंगेहात अटक केलीय. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस (Bharati University Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

25 लाखाची खंडणी स्वीकारताना RTI कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात, भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल
एसीबी पुणेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 6:25 PM

पुणे : 25 लाखाची खंडणी स्वीकारताना माहिती अधिकार (Right to Information) कार्यकर्त्याला अटक करण्यात आलीय. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी परवानगी घेतला का? अशी विचारणा करत कोर्टात कारवाई होऊ द्यायची नसेल तर 2 कोटी रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली होती. दत्तात्रय फाळके (Dattatray Phalke) असं अटक करण्यात आलेल्या आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. 2 कोटीतील 25 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात अटक केलीय. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस (Bharati University Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या उत्खननाचे काम सुरु आहे. या कामाबाबत सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत का? असं दत्तात्रय फाळके वारंवार विचारायचा. दंडात्मक कारवाई नको असेल तर 2 कोटी रुपये द्या, अशी मागणी तो करत होता. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकानं सापळा रचून आरोपी दत्तात्रय फाळकेला अटक केली आहे.

25 हजाराची लाच, 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात

एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 25 हजाराची लाच मागणाऱ्या दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे. सांगलीच्या जत पोलीस ठाण्यातील गणेश ईश्वरा बागडी आणि संभाजी मारुती करांडे असं लाचखोर या लाचखोर पोलिसांची नावं आहेत. अपघाताचा गुन्हा दाखल असलेल्या भावाला मदत करण्यासाठी, तसंच अपघतात जप्त करण्यात आलेली मोटार सायकल सोडून देण्यासाठी 2 पोलिसांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. ती रक्कम स्वीकारताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दोन पोलिसांना रंगेहात अटक केली.

माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

तीन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्लाची सुपारी देणारे आणि हल्ला करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलिसांची जेरबंद केले होते. घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे त्यांच्यावर 10 मार्च रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला आरोपींविषयी माहिती मिळाली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.