महिला रुग्णाला डॉक्टर म्हणाले, तुमची त्वचा सुंदर आहे, चिडलेल्या नवऱ्याकडून बेदम मारहाण

संतापलेला पती डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. हे प्रकरण इतके वाढले की त्याने डॉक्टरांना ठोश्यांचा प्रसाद दिला. या हल्ल्यात डॉक्टरांच्या नाक आणि डोक्याला जबर जखमा झाल्या आहेत.

महिला रुग्णाला डॉक्टर म्हणाले, तुमची त्वचा सुंदर आहे, चिडलेल्या नवऱ्याकडून बेदम मारहाण
राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 3:40 PM

मॉस्को : रुग्ण महिलेच्या त्वचेची स्तुती करणं डॉक्टरांना चांगलंच महागात पडलं. महिलेने आपल्या पतीकडे डॉक्टरची तक्रार केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरने मात्र आपण महिलेशी अत्यंत विनयतेने बोलल्याचा दावा केला आहे. या प्रकारावरुन वाद वाढल्यानंतर मारकुट्या नवऱ्याला घरात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. रशियामध्ये हा चक्रावून टाकणारा प्रकार घडला.

महिलेची पतीकडे तक्रार

ही घटना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये घडल्याची माहिती आहे. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर व्लादिमीर झिरनोक्लीव (Vladimir Zhirnokleev) यांच्याकडे एक महिला तिच्या पतीसह उपचार घेण्यासाठी आली होती. तपासणीनंतर जेव्हा ती महिला डॉक्टरांच्या केबिन बाहेर आली तेव्हा तिने पती बखरीद्दीन अझीमोव (Bakhriddin Azimov) याला सांगितले, की डॉक्टरांनी आपली त्वचा ‘सुंदर’ असल्याचे म्हटले.

नवऱ्याकडून डॉक्टरांना बेदम मारहाण

‘डेली स्टार’ या स्थानिक वर्तमानपत्राच्या अहवालानुसार, अझीमोव या गोष्टीमुळे इतका संतापला की तो थेट डॉक्टर झिरनोक्लीव यांच्या केबिनमध्ये शिरला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. हे प्रकरण इतके वाढले की त्याने डॉक्टरांना ठोश्यांचा प्रसाद दिला. या हल्ल्यात डॉक्टरांच्या नाक आणि डोक्याला जबर जखमा झाल्या आहेत.

माझी टिपण्णी वैद्यकीय, डॉक्टरांचा दावा

या घटनेवर, डॉ. व्लादिमीर झिरनोक्लीव म्हणाले की, त्याने महिलेला तिचे कोपर, पोट आणि पाठ दाखवायला सांगितले होते. मी तिला तिचे कपडे काढायला सांगितले नव्हते. तिची तपासणी केल्यानंतर, मी तिला कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले आणि सांगितले की, तुझी त्वचा “सुंदर” आहे. झिरनोक्लीव म्हणाले, की आपण फक्त त्या महिलेच्या त्वचेबद्दल आपले वैद्यकीय मत दिले होते.

डॉक्टर असाल, तर तुमचं काम करा, पतीचा हेकेखोरपणा

महिलेचा 29 वर्षीय पती बखरीद्दीन अझीमोव म्हणाले, “मला खात्री आहे की डॉक्टरांनी तपासणी दरम्यान माझ्या पत्नीची प्रशंसा केली, जी माझ्या तत्त्वात बसत नाही.” तो पुढे म्हणाला, “जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुमचे काम करा. खूप प्रशंसा आणि प्रश्न डॉक्टरांच्या व्यवसायाच्या पलीकडे आहेत.” सध्या या घटनेनंतर अझीमोवला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे आणि त्याला कायदा आणि नियमांनुसार वागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून नर्सचाच विनयभंग

मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला होता.

नागपुरात वरिष्ठ डॉक्टरकडून अतिप्रसंग

दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला होता. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.