वडिलांसोबत उपचारासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडूनच विनयभंग

शाहिद पठाण

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 9:48 AM

गोंदियात राहणारी 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे

वडिलांसोबत उपचारासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडूनच विनयभंग
डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग

गोंदिया : उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील कट्टीपार भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी आमगाव पोलिसात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदियात राहणारी 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे ही घटना घडली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी लंपट डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. हरीणखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे.

नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून नर्सचाच विनयभंग

मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला होता.

नागपुरात वरिष्ठ डॉक्टरकडून अतिप्रसंग

दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला होता. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI