सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक

सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक
रियाझ काझी

सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली आहे. (Riyaz Kazi arrested by NIA)

अनिश बेंद्रे

| Edited By: Yuvraj Jadhav

Apr 11, 2021 | 11:52 AM

मुंबई : सचिन वाझेंचे (Sachin Vaze) साथीदार एपीआय रियाज काझी (Riyaz Kazi) यांना अटक करण्यात आली आहे.रियाज काजी यांची अनेक वेळा एनआयए (NIA)अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएनं रियाझ काझी यांची चौकशी केली होती. सचिन वाझेच्या अटकेनंतर रियाझ काझी एनआयएच्या रडारवर आले होते. सचिन वाझे याचा सहकारी पीएसआय रियाज काझी याला एनआयएने कटात सामील असल्यामुळे व पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती आहे. (Riyaz Kazi aide of Sachin Vaze arrested by National Investigation Agency relation with Ambani bomb Scare)

कोण आहेत एपीआय रियाझ काझी?

रियाझ काझी हे 2010 च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी 2010 सालच्या 102 व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.

पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. 9 जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.

कंगना-ह्रतिकपासून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास, अर्णब गोस्वामीला घरातून अटक करण्यातही भूमिका

सीआययु पथकाने केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सचिन वाझे यांच्यासोबत एपीआय रियाझ काझी आणि एपीआय होवोळ देखील सहभागी होते. यामध्ये टीआरपी घोटाळ्याचा तपास, डिसी अवंती कार घोटाळा, फेक सोशल मीडिया फॉलोवर्स प्रकरण आणि कंगना हृतिक वाद प्रकरणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करताना सीआययु युनिटने बजावलेल्या भूमिकेत एपीआय रियाझ काझी यांचाही वाझे यांच्यासोबत सहभाग होता.

स्फोटकं ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट तयार करण्यात एपीआय काझींचा सहभाग असल्याचा आरोप

ज्या गाड्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या त्यांच्या नंबरप्लेट्स गुन्ह्याच्या दिवशी वारंवार बदलण्यात आल्या होत्या. या नंबरप्लेट्स बनवून घेण्यात एपीआय रियाझ काझी यांचा सहभाग आहे, असा एनआयएचा दावा आहे.

संबंधित बातम्या: 

Riyaz Kazi : वाझेनंतर NIA चौकशी करत असलेले API रियाझ काझी कोण आहेत?

वाझेंची भूमिका उघडी पडते आहे पण काझी आणि API होवाळ का रडारवर? वाचा सविस्तर

(Riyaz Kazi aide of Sachin Vaze arrested by National Investigation Agency relation with Ambani bomb Scare)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें