वाझेंची भूमिका उघडी पडते आहे पण काझी आणि API होवाळ का रडारवर? वाचा सविस्तर

हे दोन्ही अधिकारी CIU युनिटमध्ये सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. त्यामुळे अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटात तेदेखील सहभागी आहेत का, ही शक्यता एनआयएकडून पडताळून पाहिली जात आहे. | NIA CIU

वाझेंची भूमिका उघडी पडते आहे पण काझी आणि API होवाळ का रडारवर? वाचा सविस्तर
सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे

ठाणे: अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आता चौकशीचा फास आणखीनच आवळण्यात आला आहे. त्यामुळे आता सचिन वाझे (Sachin vaze) यांच्यापाठोपाठ गुन्हे तपास शाखेचे (CIU) इतर अधिकारीही रडारवर आले आहेत. सचिन वाझे यांचे निकटचे सहकारी रियाझ काझी यांची रविवारी जवळपास 9 तास चौकशी झाली होती. त्यानंतर सोमवारी एनआयएने त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले. याशिवाय, सहायक पोलीस निरीक्षक (API) होवाळ यांचीही ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. (Sachin Vaze close aid introgation by NIA team)

हे दोन्ही अधिकारी CIU युनिटमध्ये सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. त्यामुळे अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटात तेदेखील सहभागी आहेत का, ही शक्यता एनआयएकडून पडताळून पाहिली जात आहे. त्यासाठी गेल्या चार तासांपासून रियाझ काझी आणि होवाळ यांची उलटतपासणी सुरु असल्याचे समजते.

NIA वाझेंच्या सहकाऱ्यांची इतकी कसून चौकशी का करत आहे?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी ‘एनआयए’ने नुकतीच ताब्यात घेतली होती. मात्र, या गाडीविषयी NIAच्या अधिकाऱ्यांना अद्याप संभ्रम आहे. ही गाडी गुन्ह्यात वापरताना गाडीची ओळख पटू नये म्हणून गाडीत अनेक बदल करून काळजी घेतली होती अस नव्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे.

CTV मध्ये जी गाडी दिसतेय त्या गाडीच्या मागच्या काचेवर POLICE लिहिलेलं नव्हतं. मात्र, NIA ने ताब्यात घेतलेल्या इनोव्हा गाडीवर पोलीस असे लिहिल्याच दिसून येते. तसेच गाडीच्या मागच्या बंपरवरचा गार्डही NIA ने गाडी ताब्यात घेतल्यावर दिसून आला नाही. मात्र सीसीटीव्हीत तो गार्ड दिसत आहे. या सगळ्या गोष्टीवरून गुन्ह्यात गाडी वापरताना हे बदल करण्यात आले होते का असा संशय NIA ला आहे. त्याचा तपास सध्या सुरु आहे. CIU पथकातील अधिकाऱ्यांची याच अनुषंगाने चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नंबरप्लेट तयार करण्यात आलेल्या दुकानाचा मालक म्हणतो…

मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असून आता नवीन माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराशेजारी मिळाली ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. या स्कॉर्पिओ गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सद्गुरु कार डेकोरेटरच्या दुकानातुन बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवीन तलरेजा असे या दुकानाच्या मालकाचे नाव आहे. त्यांना याविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, मनसुख हिरेन माझ्याकडून नंबर प्लेट बनवण्याची ऑर्डर देत असे आणि मी त्या पद्धतीने  त्यांना नंबर प्लेट बनून दिल्या. मनसुख हिरेन हेदेखील कार डेकोरेशनच्या व्यवसायात होते. त्यामुळे त्यांना या नंबरप्लेटस लागत असतील, असे मला वाटले.

माझ्या दुकानात दोनवेळा पोलीस आले, एकदा सचिन वाझे स्वतः आले सोबत चार पोलीस होते, नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा टीम आली, 5 जण होते पण सचिन वाझे नव्हते. त्या टीमने माझी डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्हा फुटेज अशा सर्व गोष्टी नेल्या. आता माझ्याकडे कोणताही डेटा नाही, असे नवीन तलरेजा यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

(Sachin Vaze close aid introgation by NIA team)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI