सांगली ते डोंबिवली, अपघात, चोरीचा थरार, सीसीटीव्हीत कैद

चोरी, दुचाकी आणि कारच्या अपघाताची अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. (Sangli accident and theft recorded in CCTV)

सांगली ते डोंबिवली, अपघात, चोरीचा थरार, सीसीटीव्हीत कैद


सांगली: शहरातील संघर्ष मार्केटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी 4 ते 5 दुकाने फोडून चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी म्हणून दुकानदार आक्रमक झाले आहेत. तर, सांगली-मिरज माधवनगर बायपास रोडवर अंगाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकी आणि कारच्या अपघाताची अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या घटनेत प्रकाश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डोंबिवलीत घरफोडी, चैनस्नॅचिंग करणाऱ्या सहा आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Sangli accident and theft incident record in CCTV)

सांगलीतील संघर्ष मार्केट मध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यानी ४ ते ५ दुकाने फोडली. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सांगलीतील स्टेशन चौकातील संघर्ष मार्केट मध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यानी ४ ते ५ दुकाने फोडली आहेत. शटर कट करून चोरटे दुकानात शिरून चोरी करत असतानाची सगळी घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

चोरीच्या वाढत्या घटनांमुळे दुकानदार आक्रमक

संघर्ष मार्केटमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने दुकानदार चिंतेत आहेत. पोलिसांना तक्रार देवून ही चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने पोलिसांच्या विरोधात गाळे धारकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा दुकान मालकांनी दिला आहे.

दुचाकी आणि कारचा भीषण अपघात

सांगलीतील भारत सुतगिरण ते माधवनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये समोरासमोर धडक झाली. ही घटना शनिवारी सांयकाळी पाच वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रकाश नानसो जाधव वय 40 ठार झाले. दुचाकीवरून प्रकाश नानासो जाधव हे भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या अल्टो कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. (Sangli accident and theft incident record in CCTV)

अपघातात दुचाकी चक्काचूर

अल्टो कार आणि दुचाकीची ही धडक एवढया जोरात होती की दुचाकीस्वार गाडीवरून उडून दहा ते पंधरा फूट लांब रस्त्याच्या कडेला पडला. तर दुचाकीचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. या अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे डोंबिवलीत सहा चोरट्यांना अटक

डोंबिवलीत घरफोडी, चैनस्नॅचिंग करणाऱ्या सहा आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल, लॅपटॉप, बॅटरी ,काही दागिने आणि एक रिक्षा जप्त करण्यात आले आहेत. काही दिवसांपासून चोरी, चेन स्नॅचिंग च्या घटनेत वाढ झाली होती. डोंबिवलीत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून चोर पसार झाले होते. आडीवलीत 11 घरफोडीच्या घटना समोर आल्या होत्या. पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या कारवाईत सहा चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सोनसाखळी चोरट्यांचा देखील समावेश आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी बाळासाहेब पवार,सुरेश डांबरे उपस्थित होते. सीसीटीव्हीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हे गुन्हे उघडकीस आले आहेत.

संबंधित बातम्या:

आधी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, नंतर चेन स्नॅचिंग, आता एकाचवेळी 11 ठिकाणी चोरी, कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट

इचलकरंजीमध्ये मटक्याच्या अड्ड्यांवर छापे, 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त

(Sangli accident and theft incident record in CCTV)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI