AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Suicide : सांगली हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो. संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

Sangli Suicide : सांगली हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं
सांगली हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्याImage Credit source: tv9
| Updated on: Jun 20, 2022 | 3:04 PM
Share

सांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्महत्या केली आहे(Financial Problem). सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये (Miraj Family Suicide) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो. संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.

ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर प्रकार समोर

अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.

आत्महत्या का केली?

आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

कुणी केली आत्महत्या?

आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचं नाव वनमोरे असून दोन भावांनी आपलं अख्खं कुटुंब संपवलंय. या आत्महत्येनं खळबळ माजलीय. माणिक वनमोरे आणि पोपर वनमोरे असं आत्महत्या केलेल्या दोघा भावांची नावं आहे. ज्यांचे मृतदेह आढळून आलेत, त्यात या दोघा भावांसह आई, पत्नी आणि मुलांचा समावेशही आहे.

कुठे आहे म्हैसाळ?

म्हैसाळ गाव हे सांगली जिल्ह्यातील मिरज गावात आहे. मिरज तालुक्यापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आत्महत्या केलेले दोघेही सख्खे भाऊ आहे. म्हैसाळ गावातील अंबिकानगरमध्ये ही घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

मृतांची नावं पुढीलप्रमाणे

डॉक्टर माणिक येलाप्पा वनमोरे आक्काताई वनमोरो, माणिक वनमोरे यांची आई रेखा माणिक वनमोरे, माणिक वनमोरे यांची बायको प्रतिमा वनमोरे, माणिक वनमोरे यांची कन्या आदित्य वनमोरे, माणिक वनमोरे यांचा मुलगा पोपट येलाप्पा वनमोरे, माणिक वनमोरे यांचे सख्खे भाऊ अर्चना वनमोरे, पोपट वनमोरे यांची पत्नी संगिता वनमोरे, पोपट वनमोरे यांचा यांची मुलगी शुभम वनमोरे, पोपट वनमोरे यांचा मुलगा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.