शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली (Sangli crime News) जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon) येथील शिवसेनेच्या शहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चाकू आणि लोखंडी रॉडसह हा हल्ला करण्यात आल्याची माहितीसमोर आली. याप्रकरणी सांगली पोलिसांनी एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगलीतील तासगाव पोलिसांकडून केला जातोय.