2 बायकांचा नाद नवऱ्याला पडला महागात, ‘या’ ठिकाणी सापडला मृतदेह, 3 दिवसांनंतर गूढ उकललं

पहिल्या की दुसऱ्या बायकोने केली नवऱ्याची हत्या? सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या नवऱ्याचा अशा अवस्थेत आढळला मृतदेह... धक्कादायक आहे प्रकरण... याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

2 बायकांचा नाद नवऱ्याला पडला महागात,  या ठिकाणी सापडला मृतदेह, 3 दिवसांनंतर गूढ उकललं
| Updated on: Oct 12, 2025 | 11:09 AM

Crime : पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करणं हे कायद्याच्या विरोधात आहे. पण अनेक ठिकाणी पुरुषांनी दोन लग्न केली आहेत आणि दोन्ही पत्नींसोबत संसार करत आहे. पण सवतींचं एकमेकांसोबत जुळवून घेणं अशक्य आहे. अशाच प्रकरणात अडकलेला नवरा सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. अखेर तीन दिवसांपूर्वी पुरुषाचा मृतदेह घरात असलेल्या विहीर आढळला आहे. चान्हो पोलीस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे बधिया गावात सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर, पोलिसांनी त्याचा मृतदेह एका विहिरीतून बाहेर काढला जिथे पत्नीने पतीची हत्या केली, त्याचा मृतदेह विहिरीत पुरला आणि नंतर विहीर पूर्णपणे जेसीबीने भरली.

सहा महिने वडील घरी परतले नाहीत, म्हणून मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि तीन दिवसांत पोलिसांनी मृतदेह शोधून काढला. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती वादातून प्रकरण इतक्या टोकाला गेलं. पत्नीने केवळ तिच्या पतीची हत्याच केली नाही तर, पुरावा नष्ट करण्यासाठी विहीरही बंद केली. पोलिसांच्या सतर्क कारवाई आणि तिच्या मुलाच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले आणि एक मोठे कट उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती रामबली यादव याने दुसरं लग्न चंपा हिच्यासोबत केलं होतं आणि वाराणसी येथे राहत होता. यादरम्यान, रामबली जमीन खरेदी – विक्रीचं काम करत होता. अशात रामबली त्याच्या कमाईतील अधिक भाग पहिल्या पत्नीला देत असे. यामुळे चंपा प्रचंड संतापली होती. अखेर तिने संतापात पतीला जीवे मारण्यासाठी कट रचला. चंपाने तिच्या पतीला मारण्यासाठी बुधमूच्या गोळीबार करणाऱ्यांना 30 हजार रुपयांची सुपारी दिली आणि 20 हजार रुपये आधिच दिले.

हत्येच्या रात्री आरोपीने रामबली यादववर तीन गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृतदेह घरामागील विहिरीत फेकून दिला. त्यानंतर संशय येऊ नये आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विहीर जेसीबी मशीनने भरण्यात आली. सहा महिने मृतदेह विहिरीतच होता आणि प्रकरण दाबून टाकण्यात आलं. जेव्हा रामबली यादव सहा महिने बेपत्ता राहिला तेव्हा त्याचा मुलगा राहुल याने चान्हो पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयाच्या आधारे दुसरी पत्नी चंपा हिला ताब्यात घेतलं. कठोर चौकशीत तिने संपूर्ण कट कबूल केला. मृतदेह सापडल्याने संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. रांची ग्रामीण पोलिस अधीक्षक प्रवीण पुष्कर यांनी सांगितले की, मुख्य आरोपी चंपासह चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चंपाहिने स्वतःचा हत्येचा कट रचला आणि सुपारी दिली… असं चौकशीत समोर आलं आहे .