AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामा हल्ल्यात गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत 32 लाख उकळले, सायबर भामट्यांचा वृद्धाला गंडा

आजकाल सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे नागरिक धास्तावल आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे हे प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखीचे कारण बनले आहे. कठोर उपाययोजना, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केल्यानंतर सायबर भामटे काही ना काही नव्या क्लुप्त्या लढवून लोकांना लुटतच आहेत.

पुलवामा हल्ल्यात गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत 32 लाख उकळले,  सायबर भामट्यांचा वृद्धाला गंडा
| Updated on: May 21, 2024 | 10:32 AM
Share

आजकाल सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे नागरिक धास्तावल आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे हे प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखीचे कारण बनले आहे. कठोर उपाययोजना, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केल्यानंतर सायबर भामटे काही ना काही नव्या क्लुप्त्या लढवून लोकांना लुटतच आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईतही घडला असून एका वृद्ध नागरिकाला 32 लाख रुपय गमवावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. पुलवामा येथील हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगून कारवाईचा धाक दाखवत वृद्ध व्यक्तीला धमकावले आणि त्याच्याकडून लाखो रुपये उकळले.

नवी मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शरद पाटील (वय 82)असे पीडित वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी २ अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पाटील हे सीवूड येथील ची सेक्टर ५४ मधील एनआरआयवे कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गेल्या रविवारी त्यांना दोन भामट्यांनी फोन केला. तुमचा पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. देशद्रोह आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात तुम्ही फरार आरोपी आहात असे सांगून अटक टाळायची असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्या असे सांगितले. आणि वेगवेगळ्या खात्याद्वारे त्यांच्याकडून 32 लाख रुपये उकळले आहे. काही दिवसांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि पाटील यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. नवी मुंबई सायबर सेल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...