300 फूट खोल दरीत व्यापाऱ्याचा नग्नावस्थेत मृतदेह, हत्या करणाऱ्या नोकराचा पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा आरोप

मध्यप्रदेशच्या इंदूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूरच्या लसूडिया पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेले टायर व्यावसायिक अशोक वर्मा यांचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे.

300 फूट खोल दरीत व्यापाऱ्याचा नग्नावस्थेत मृतदेह, हत्या करणाऱ्या नोकराचा पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा आरोप
प्रातिनिधीक फोटो

भोपाळ : मध्यप्रदेशच्या इंदूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदूरच्या लसूडिया पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेले टायर व्यावसायिक अशोक वर्मा यांचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे सिमरौलच्या जंगलात 300 फूट खोल दरीत अशोक यांचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अशोक यांच्या दुकानातील माजी कर्मचाऱ्यानेच आपल्या पत्नीच्या मदतीने त्यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आरोपीने अशोक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशोक यांनी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ बनवला. नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप हत्या करणाऱ्या नोकराने केला आहे.

नेमकं काय घडलं?

इंदूरचे टायर व्यावसायिक अशोक वर्मा शनिवारी (2 ऑक्टोबर) सकाळी घराबाहेर पडले होते. ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात गेले होते. पण ते दुकानात पोहोचलेच नाहीत. तसेच ते रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नव्हते. त्यांचा मोबाईल फोनही बंद होता. त्यामुळे त्यांचा संपर्क होत नव्हता. अशोक यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबिय अस्वस्थ झाले. त्यांनी शोधाशोध केली. अशोक यांच्या मित्रांना, नातेवाईकांकडे विचारपूस केली. पण सगळीकडून निराशा हाती लागत होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी अखेर पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते इंदूरच्या लसूडिया पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिसांकडे अशोक यांच्या बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंद करत तपासाला सुरुवात केली.

हत्येचा उलगडा करणं पोलिसांना कठीण

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना अशोक वर्मा यांच्या घराजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्येच पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. कारण सीसीटीव्हीत अशोक दुचाकीने जाताना दिसत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या दुकानात काम करणारा माजी कर्मचारी आणि त्याची पत्नीदेखील होती. विशेष म्हणजे अशोक यांच्यासोबत दुचाकीने गेलेले दाम्पत्यही गायब होते. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करणं पोलिसांपुढे अवघड होऊन बसलं होतं.

जंगलात संशयास्पदरित्या मृतदेह सापडला

या दरम्यान सिमरौलच्या जंगलात एका दरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली तेव्हा ते देखील चक्रावले. कारण संबंधित ठिकाणी मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. मृतकाच्या अंगावर कपडे नव्हते. पोलिसांनी तो नग्नावस्थेत असलेला मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता तो मृतदेह अशोक वर्मा यांचाच असल्याचं उघड झालं.

पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यात यश

अशोक यांचा मृतदेह आढळला. त्यांच्यासोबत असलेलं दाम्पत्य मात्र बेपत्ता होतं. अशोक यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती आणि मोबाईल लोकेशन ट्रेस करुन अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनीच अशोक वर्मा यांचा खून केल्याचं कबूल केलं. विशेष म्हणजे आरोपींनी अशोक यांच्या हत्येमागे जे कारण सांगितलं ते देखील धक्कादायक आहे.

आरोपींनी पोलिसांना हत्येमागे कथित कहाणी सांगितली

आरोपी नोकराने अशोक यांची हत्या का केली? याचं कारण पोलिसांना सांगितलं. यावेळी त्याने अशोक यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोपी नोकर राजकुमार हा मृतक अशोक वर्मा यांच्या दुकानात 2015 मध्ये काम करत होता. या दरम्यान अशोक यांची ओळख आरोपीची पत्नी ब्रजेश हिच्यासोबत झाली. अशोक ब्रजेश हिच्यासोबत जबरदस्ती करु लागला असल्याची माहिती राजकुमारला मिळाली. त्यामुळे त्याने नोकरी सोडली. त्यानंतर तो आपल्या गावी गेला. लॉकडाऊननंतर आरोपी राजकुमार हा पत्नी ब्रजेश हिच्यासह इंदूरला पुन्हा आला. यावेळी देखील अशोक यांनी ब्रजेश हिच्यासोबत शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे आरोपींनी हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

हेही वाचा :

बाईक जाळल्या, हातात तलवारी नाचवणारे सीसीटीव्ही समोर, कल्याणमध्ये गुन्हेगारी शिगेला

सावध व्हा ! भामट्यांकडून आधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं मार्गदर्शन, फायदा मिळवून देत जास्त पैशांचं आमिष, नंतर लाखोंनी लुटलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI