बाईक जाळल्या, हातात तलवारी नाचवणारे सीसीटीव्ही समोर, कल्याणमध्ये गुन्हेगारी शिगेला

कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळेत मद्यधुंद तरुणांकडून नागरीकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. कल्याणच्या शिवाजी कॉलनी परिसरात मद्यधुंद तरुणांनी रात्रीच्या वेळी प्रचंड धुडगूस घातला.

बाईक जाळल्या, हातात तलवारी नाचवणारे सीसीटीव्ही समोर, कल्याणमध्ये गुन्हेगारी शिगेला
बाईक जाळल्या, हातात तलवारी नाचवणारे सीसीटीव्ही समोर, कल्याणमध्ये गुन्हेगारी शिगेला
अमजद खान

| Edited By: चेतन पाटील

Oct 04, 2021 | 6:52 PM

कल्याण : कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळेत मद्यधुंद तरुणांकडून नागरीकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. कल्याणच्या शिवाजी कॉलनी परिसरात मद्यधुंद तरुणांनी रात्रीच्या वेळी प्रचंड धुडगूस घातला. यावेळी आरोपींनी परिसरातील महागड्या गाड्या जाळल्या. त्यांच्या या हैदोसात प्रचंड गाड्यांचं नुकसाण झालं आहे. या प्रकारात ज्या गाड्यांचं नुकसाण झालं आहे त्याच्या मालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची तक्रार केली आहे. विशेष म्हणजे कल्याणमध्ये या अशाप्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील शिवाजी कॉलनी परिसरात रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींकडून चार मोटारसायकल जाळण्यात आल्या आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात कारणावरुन या गाड्या जाळण्यात आल्या आहेत, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक नागरीकांचा स्पष्ट आरोप आहे की, परिसरातील काही तरुण दहशत माजविण्यासाठी गाड्या जाळत आहेत.

सबंधित प्रकारामुळे परिसरातील महिला जास्त भयभीत झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व भागात रात्रीच्या वेळी धिंगाणा करणाऱ्या मद्यधुंद तरुणामुळे परिसर जास्त बदनाम झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच काही तरुण तलवारी घेऊन रस्त्यावर फिरत असताना दिसून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असली तरी अशा प्रकारच्या मानसिकतेचे अंत होणे अतिशय गरजेचे आहे. कारण लोकांमध्ये आता भीती निर्माण झाली आहे. पोलिसांचे भय या अपराधी कृत्य करणाऱ्यांमध्ये निर्माण करायचे असल्यास पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

काही दिवसांपूर्वी तरुणांचे हे कृत्य एका सीसीटीव्हीत कैद झाले होते. या सीसीटीव्हीमध्ये तरुणांच्या हातात काठ्या होत्या. परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांसह अन्य वस्तूंचे नुकसान करण्यासाठी ते चाळीत फिरत होते. तेच तरुण पुन्हा दुसऱ्या रस्त्याने आले. त्यांनी गाड्या जाळल्या. तसेच काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या तीसगाव परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडीओंमधील तरुणांच्या हाती तलवारी दिसल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कल्याणमध्ये टवाळखोरांची डेरिंग वाढतेय

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली आहे. चक्कीनाका, खडेगोळवली, कैलास नगर, चिकणीपाडा या परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर तरुण विनाकारण नागरिकांना त्रास देतात. रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत तरुण घराबाहेर पडतात. दारूच्या नशेत निष्पाप नागरिकांना मारहाण करतात, वाहनांची तोडफोड करतात, पोलीस कारवाई करतात. मात्र या टवाळखोर तरुणांना राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांकडून ठोस पावले उचलण्यात अडचणी येतात. यामुळे तरुणांची डेरिंग वाढते आणि या तरुणांकडून गैरप्रकार घडतात.

चिकणीपाड्यातही मद्यधुंद तरुणांचा हैदोस

कल्याणच्या चिकणीपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. दोन तरुण रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत आले. हे दोघे एका तरुणाच्या शोधात होते. तो सापडला नाही. या दोघांनी दारुच्या नशेत दहशत माजवण्यासाठी परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना निशाणा केला. त्यांनी बाईक, कार, रिक्षांची तोडफोड केली. तसेच एका तरुणाला जखमी केले.

हेही वाचा :

बापच बनला कंस, नवजात बाळाला हवेत फेकलं, छताला आपटून संपवलं, त्याने पोटच्याच मुलाला का मारलं?

सर्वसामान्यांना फसविण्याचा अनोखा फंडा, परदेशी चलनाच्या नावाखाली लाखोंचा गंडा, पुण्यात अखेर भामटे गजाआड

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें