AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Mohol Murder | शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट समोर, मोहोळ संपवण्यासाठी नाही बोलला म्हणून मामा-भाचाने…

Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ हत्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठी माहिती समोर येत आहे. आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी डिसेंबरमध्ये मुळशीमधील भूगावमध्ये मोठा राडा केलेला.

Sharad Mohol Murder | शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट समोर, मोहोळ संपवण्यासाठी नाही बोलला म्हणून मामा-भाचाने...
Sharad Mohol accuse munna polekar (2)
| Updated on: Jan 13, 2024 | 9:41 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.  पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे मोहोळ याच्या घराजवळच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्याता आली होती. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने पुणे हादरून गेलेलं. जवळच्या साथीदाराने एकदम फुलफ्रुफ प्लॅन बनवत मोहोळ याला संपवलं. भाच्याने मामासाठी मोहोळच्या टोळीत जात संधी मिळताच त्याला संपवलं. मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे हा मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे. अशातच या प्रकरणामध्ये आणखी मोठी माहिती समोर आली आहे.

शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मदत करत नाही म्हणून मामा-भाचांनी मुळशीतील भूगावमधील एकावर गोळीबार केला होता.  साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी 17 डिसेंबरला गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबरमध्येही शरद मोहोळ याला मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. भूगावमधील नेमक्या कोणावर नामदेव कानगुडे आणि साहिल पोळेकर यांनी गोळीबार केला गेला त्याचं याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.

या प्रकरणामध्ये आरोपी पोळेकर आणि कानगुडे यांनी मध्य प्रदेशमधून पिस्तुल घेतल्याची माहिती आहे. धनंजय वटकर आणि सतीश शेडगे यांनी ही शस्त्रे मागवली होतीत. त्यांनाही पोलिसांनी अटक केली असून मध्य प्रदेशमधून नेमकी कोणी शस्त्र पुरवलीत याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी आरोपी असलेल्या वकिलांना या हत्येची आधीच माहिती असल्याचा दावा केला आहे.

मोहोळला कसा संपवला?

दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला  दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली. मोहोळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला होता. आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते. मोहोळसोबत बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहोळ याला जागीच ठार केलं. पुण्यात या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती, आरोपींना पोलिसांनी त्याच रात्री शिरवळदरम्यान पकडत अटक केली होती.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.