AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते… शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड

Sharad mohol murder case | शुक्रवारी पुण्यात दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने सर्वच हादरले. कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार करून त्याटी हत्या करण्यात आली. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ माजली. या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या हत्याकांडाप्रकरणी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते... शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड
| Updated on: Jan 08, 2024 | 8:29 AM
Share

पुणे | 8 जानेवारी 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर शुक्रवारी दुपारी कोथरूडमधल्या सुतारदरा या ठिकाणी गोळीबार झाल्याची बातमी आली आणि गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली. जखमी शरद मोहोळ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. सुरवातीला त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथून त्याला ससूनला हलवलं. मात्र काही तासातच गंभीररित्या जखमी असलेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणि ही बातमी पुणे शहरासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली.. दिवसाढवळ्या भर रस्त्यात कुख्यात गुंडाला गोळ्या घालत त्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली

खरंतर ज्या दिवशी हे हत्याकांड झालं तो दिवस म्हणजे 5 जानेवारी, त्याच दिवशी शरद मोहोळचा लग्नाच्या वाढदिवस होता. त्याच्या घरातून जेवल्यावर बाहेर पडलेल्या आरोपींनी शरद मोहोळवर घराजवळच तीन ते चार गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण होतं. गोळ्या झाडून आरोपी तेथून लागलीच पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याला उपचारांसाठी रुग्णालयात तर दाखल केले, पण तेथेच त्याचा मृत्यू झाला.

महिन्याभरापासून शिजत होता हत्येचा कट

शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यात खळबळ माजली, या हत्याकांडाने अनेकांना धक्का बसला. पण मिळालेल्या माहितीनुसार, हे काहीही अचानक घडलेलं नाही. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते आणि याचा शरद मोहोळला जरासुद्धा सुगावा लागला नाही. शरद मोहोळ याचा खून करणारी त्याच्याच जवळची होती हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

दहा वर्षांपूर्वी केली होती मारहाण

दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती. त्याचाच राग आरोपींच्या मनात धुमसत होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. त्यातूनच हत्येचा हा कट रचला. शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशी घरात जेवल्यानंतर आरोपींनी त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या केली.

आठ आरोपींना अटक

या सगळ्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीये. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत. हे सगळे आरोपी शरद मोहोळची हत्या करून पुण्यातील खेड शिवापुर टोलनाकाच्या जवळ असणाऱ्या एका जागी थांबले हो.ते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा-टाकत आठही जणांना अटक केली असून या आरोपींना आता पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.

दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्यावर पर्यायाने फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकारी आणि शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी आज पुण्यात देवेंद्र यांची भेट घेत मला न्याय मिळायला हवा अशी मागणी केली आहे

फडणवीस स्वाती मोहोळ भेट

पत्नीला राजकारणात लॉन्च केल्यानंतर शरद मोहोळ छोटा राजनप्रमाणे हिंदुत्ववादी डॅान म्हणून ओळख सांगण्याचा प्रयत्न करू लागला .हिंदुत्ववादी संघटनांच्या व्यासपीठावर कार्यक्रमांना हजेरी लावणे , विविध हिंदू सणांना मोठे कार्यक्रम आणि उत्सव साजरा करणे आणि पुढे राजकीय महत्त्वकांक्षासाठी गुन्हेगारी करावयादेखील शरद मोहोळ कडून थांबवण्यात आल्या होत्या.. मात्र गुन्हेगारी सोडलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळचा असा शेवट होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.